नवी दिल्ली
कार निर्मितीतील कंपनी होंडा कार्सने ग्राहकांना वित्तसहाय्यासाठी कॅनरा बँकेशी हातमिळवणी केली आहे. याअंतर्गत कंपनी ग्राहकांना उत्सवी काळात आकर्षक कर्जाची सोय कार खरेदीवर उपलब्ध करणार असल्याचे समजते.

होंडा कार्सच्या ग्राहकांना कॅनरा बँकेच्या व्हेईकल लोनवर आकर्षक व्याजदरावर कर्ज घेण्याची सोय होणार आहे. अमेझ, सिटी, झॅज आणि डब्ल्यूआरसारख्या कार्स कार लोनवर घेता येणार आहेत. यासह इतर बँकांशी भागीदारी करण्याचा विचार कंपनी करत असल्याचे समजते. देशातील दूरवरच्या शहरांमध्ये व ग्रामीण भागांमध्ये कर्ज देण्यासाठी कंपनीचा प्रयत्न राहणार आहे.









