ऑनलाईन टीम
हुंड्यासाठी सुनेचा छळ केल्याप्रकरणी बिजू जनता दलाच्या एका खासदाराविरोधात तक्रार दाखल झाली आहे. ओडिशाचे कटक लोकसभा खासदार भर्तृहरि महताब, त्यांची पत्नी आणि मुलाच्या विरोधात ही तक्रार दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी मध्य प्रदेश पोलिसांनी महताब यांच्याविरोधात कारवाई केली आहे.
महताब यांची सून साक्षी यांनी बुधवारी भोपाळच्या महिला पोलीस स्टेशनमध्ये पती, सासरे आणि सासू यांच्या विरोधात हुंडासाठी छळवणूक केल्याची तक्रार दाखल केली. हुंड्यासाठी सासरचे लोकं छळ करत असल्याचं साक्षी यांनी तक्रारीत म्हटलं आहे. तसंच तिच्या कुटुंबाने 2016 मध्ये तिच्या सासऱ्यांना हुंडा म्हणून 1.5 कोटी दिले, पण ते अधिक पैशांची मागणी करत असल्याचा आरोप देखील साक्षी यांनी केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खासदार भर्तृहरि महताब, त्यांची पत्नी महाश्वेता आणि मुलगा लोकरंजन यांच्या विरोधात, IPC कलम 498, 506 आणि 34 आणि हुंडा प्रतिबंधक कायदा, कलम 3/4 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारादर सून साक्षी यांचं लग्न ओडिशाच्या बीजू जनता दलाच्या खासदाराचा मुलगा लोकरंजन यांच्यासोबत 2016 ला झालं होते.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









