वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारताची महिला धावपटू हिमा दासला कोरोनाप्रतिबंधक लसीचा पहिला डोस देण्यात आला. 21 वर्षीय हिमा दास सध्या पतियाळातील साईच्या केंद्रामध्ये सराव करीत आहे.
फिल्ड आणि ट्रकमध्ये कोरोनाप्रतिबंधक लस घेणारी हिमा दास ही भारताची पहिली अव्वल महिला धावपटू आहे. देशातील इतर ऍथलीट्सनी कोरोना लसीसाठी अखिल भारतीय ऍथलेटिक्स फेडरेशनकडे आपली नावे नोंदविली असून त्यांना लवकरच कोरोनाची लस दिली जाणार आहे. पोलंडमध्ये 1-2 मे रोजी झालेल्या विश्व़ ऍथलेटिक्स रिलेमध्ये हिमा दास सहभागी होणार होती. पण देशातील कोरोना परिस्थिती चिंताजनक झाल्याने हवाई प्रवासावर बंदी घातल्याने हिमा दासला या स्पर्धेत सहभागी होता आले नाही.









