प्रतिनिधी /बेळगाव
बेळगावच्या स्नेहम इंटरनॅशनलला यावर्षीचा ‘उत्तम उद्योजकता’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. हुबळी येथे झालेल्या टाय-हुबळी कार्यक्रमात पुरस्काराचे वितरण करण्यात आले. मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्या हस्ते कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक अनिश मेत्राणी यांनी पुरस्कार स्वीकारला. या कार्यक्रमाला क्रिकेटपटू कपिलदेव, इस्कॉनचे गौरांगप्रभू दास यासह इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती.









