सौंदलगा : येथील सरकारी उच्च प्राथमिक मराठी मुलींच्या शाळेमध्ये पालक मेळावा घेण्यात आला. अध्यक्षस्थानी एसडीएमसी अध्यक्ष दत्तात्रय पाटील होते. या कार्यक्रमात नूतन ग्रा. पं. सदस्य तसेच संरक्षण दलात निवड झालेल्या शाळेच्या माजी विद्यार्थिनींचा सत्कारही करण्यात आला. ग्रा. पं. सदस्य बी. आर. चौगुले, भीमराव भानसे, विनोद माने, सुवर्णा ऐवाळे तसेच पोलीस दलात निवड झालेली विद्यार्थिनी विशाखा सांगावे, बीएसएफमध्ये निवड झालेली प्रतीक्षा कोरवी व सीआयएसएफमध्ये निवड झालेली पूजा काळगुडे तसेच राज्यस्तरीय लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेत बेळगाव जिल्हा संघाच्या कर्णधारपदी निवड झाल्याबद्दल शाळेतील शिक्षक संतोष पाटील यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पल्लवी रजपूत, मीना चौगुले, राजश्री कुंभार, तबसुम मुल्ला, व्ही. आर. पाटील, एस. जी. बाकळे, एस. के. मगदूम, एस. आर. परीट, एस. डी. चौगुले यांच्यासह पालक, शिक्षक, विद्यार्थिनी उपस्थित होत्या. प्रास्ताविक मुख्याध्यापिका एस. जे. मेस्त्राr, सूत्रसंचालन व्ही. एम. नेजकर यांनी केले. एस. एन. बुर्लट्टी यांनी आभार मानले.
Previous Articleइचलकरंजीत सोमवारी अर्थसंकल्पावर चर्चासत्र
Next Article आयको स्पिनिंग मिल परिसरात कूपनलिका खोदाई









