बदल स्विकारण्याकडे ग्राहकांची पसंती : ग्रामीण भागातही खरेदीकडे ओढा
नवी दिल्ली
कोविड या शब्दाने देशासह सारे विश्वच व्यापून टाकले आहे. यामुळे जगात या विषाणूच्या थैमानामुळे काही सकारात्मक तर काही प्रमाणात नकारात्मक बदल मानवी जीवनावर होण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये सर्वच घटक प्रभावीत झाले आहेत, ही गोष्ट नाकारता येणे शक्मय नसल्याचे अभ्यासकांनी म्हटले आहे. याचाच एक भाग म्हणून लहान शहरे व कसबा गावांमध्ये ऑनलाईन किराणा साहित्याची मागणी मोठय़ा प्रमाणात वाढली असल्याचे समोर आले आहे.
या बदलात बिगबास्केट ग्रोफर्ससोबत ऑनलाईन ग्रॉसरी प्लॅटफार्मच्या आधारे महानगरे आणि लहान शहरांमधील ग्राहकांना आवश्यक लागणाऱया वस्तु पुरवल्या जात आहेत. किराणा साहित्याच्या ऑनलाईन मागणीकडे ग्राहकांचा ओढा वाढल्याचे समोर आले आहे.
महामारीच्या कारणामुळे सरकारने सामाजिक अंतर राखण्यासाठी लोकांना ठराविक अंतर राखून सर्व व्यवहार करणे बंधनकारक केल्यानंतर लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. बरेचसे लोक बाहेर पडण्यासही घाबरत आहेत, अशांना ऑनलाइन खरेदीचा मार्ग सोयीस्कर वाटतो आहे. विक्रीत वाढ पाहता नागरिकांचा कल हा ऑनलाईन खरेदीकडे वळणार असल्याचे समोर आले आहे. ऑनलाईन किराणा सेवा ही मार्च महिन्याच्या तुलनेत एप्रिलमध्ये टियर 2 शहरांमध्ये जवळपास 56 टक्क्मयांनी वाढली आहे तर महानगरांमध्ये हाच टक्का 35 टक्क्मयांनी वधारत नवीन ग्राहकांची जोडणी झाल्याचे बिगबास्केटचे सह संस्थापक हरी मेनन यांनी सांगितले आहे.









