मुंबई
अर्थसंकल्पादिवशी पासून सेन्सेक्सने पुन्हा तेजीचा सूर पकडला असून डिसेंबर 2021 पर्यंत सेन्सेक्स 55 हजार अंकांचा विक्रमी टप्पा गाठू शकतो, असा अंदाज अमेरिकेतील बहुराष्ट्रीय गुंतवणूक संस्था मॉर्गन स्टॅनले यांनी नुकताच वर्तवला आहे. अर्थसंकल्पादिवशी बीएसई सेन्सेक्सने 2 हजार अंकांची मोठी उसळी एकाच दिवशी घेतल्याने बाजारामध्ये पुन्हा नवचैतन्य परतले आहे. याआधीच्या काही दिवसाच्या सत्रात सेन्सेक्स घसरणीत होता. एकंदर आताचा कल पाहता सेन्सेक्स 55 हजाराचा टप्पा ओलांडू शकतो, असा अंदाज मॉर्गन स्टॅनले यांनी मांडला आहे.









