15 दिवसांच्या विश्रांतीची डॉक्टरांकडून सूचना
‘प्यार का पंचनामा’ फेम अभिनेत्री नुसरत भरुचाला व्हर्टिगो ऍटक आल्यावर मुंबईच्या ‘हिंदुजा’ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मुंबईतील एका स्टुडिओ दिग्दर्शक लव रंजन यांच्या आगामी चित्रपटाचे चित्रिकरण करत असताना नुसरतची प्रकृती बिघडली होती. डॉक्टरांनी नुसरतला किमान 15 दिवसांपर्यंत विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

मागील काही दिवसांपासून नुसरतची प्रकृती फारशी बरी नव्हती. तरीही तिने कुठलाच बेक न घेता काम सुरू ठेवले होते. चित्रिकरणावेळी प्रकृती बिघडल्याने नुसरतला नीट उभेही राहता येत नव्हते. नुसरतची बिघडती प्रकृती पाहता तिला चित्रपटाच्या सेटवरून थेट रुग्णालयात नेण्यात आले. नुसरतने या चित्रपटाचे 23-24 दिवसांचे चित्रिकरण पूर्ण केले आहे. पण नुसरतची प्रकृती बिघडल्याने सध्या या चित्रपटाचे चित्रिकरण रोखण्यात आले आहे. नुसरतला व्हर्टिगो अटॅक आला होता, तणावामुळे ही स्थिती ओढवली होती. सलग 3 आठवडय़ांच्या चित्रिकरणानंतर अशक्तपणा जाणवला होता. एक दिवस आराम केल्यावर बरे वाटेल असे मला वाटले. पण दुसऱया दिवशी माझी प्रकृती अधिकच बिघडली. मला व्हिलचेअरवरून रुग्णालयात नेण्यात आले. माझा रक्तदाब खालावला होता असे नुसरतने म्हटले आहे.









