67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांचे उपराष्ट्रपतींच्या हस्ते वितरण
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
67 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण सोहळा सोमवारी दिल्लीतील विज्ञान भवन येथे पार पडला. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते विजेत्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. हिंदी चित्रपटांच्या विभागात अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या ‘छिछोरे’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच कंगना रनौतला दोन चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्याचबरोबर सुपरस्टार रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आले.
67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराच्या निर्णायक मंडळाने 22 मार्च 2021 रोजी विजेत्यांची घोषणा केली होती. मात्र, कोरोना संसर्गामुळे पुरस्कार वितरण सोहळा लांबणीवर पडला होता. अखेर सोमवारी सकाळी 11 वाजता विज्ञान भवनमध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला. पुरस्कार्थींपैकी कंगनाला ‘मणिकर्णिका’ आणि ‘पंगा’ या चित्रपटातील अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले. तसेच अक्षय कुमारच्या केसरी या चित्रपटातील ‘तेरी मिट्टी’ या गाण्याचे पार्श्वगायक बी. प्राक यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. ‘मरक्कर-अराबिक्कदालिन्ते-सिम्हम’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट फिचर फिल्मचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या सोहळय़ादम्यान आनंदी गोपाळ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्काराने गौरवण्यात आले. अभिनेता धनुष आणि मनोज वाजपेयी यांना सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार प्रदान करण्यात आला असून ‘महर्षि’ चित्रपटाला सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपट या पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. चित्रपटांसाठी अनुकूल राज्य (मोस्ट फिल्मप्रेंडली स्टेट) म्हणून सिक्किमला गौरविण्यात आले.
रजनीकांत यांनी श्रेय दिले चाहत्यांना
सुपरस्टार अभिनेता रजनीकांत यांना 51 व्या दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. भारतीय चित्रपटसृष्टीत उत्कृष्ट कामगिरीबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे. या पुरस्कारासाठी रजनीकांत यांचे नाव एप्रिलमध्येच जाहीर करण्यात आले होते. रजनीकांत यांनी पुरस्कार स्विकारल्यानंतर ट्विट करत चाहत्यांना धन्यवाद आणि श्रेय देण्याबरोबरच केंद्र सरकारचे आभार मानले आहेत. रजनीकांत यांनी आपल्या 30 वर्षांच्या कारकिर्दीत देशभरातच नाही तर जगभरात आपल्या चाहत्यांच्या मनात घर केले आहे. त्यांनी आपल्या अभिनयाची सुरुवात नाटकांमधून केली होती. त्यानंतर आतापर्यंत तामिळ, मल्याळी, हिंदी, इंग्रजी, बंगाली अशा वेगवेगळय़ा भाषांमधील चित्रपटांमध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत. सिनेसृष्टीत महत्त्वाची कामगिरी बजावल्यामुळे दादासाहेब फाळके पुरस्काराने रजनीकांत यांचा गौरव करण्यात आल्यामुळे त्यांच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त करत सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.
सुपरस्टार रजनीकांत भावूक अन् आनंदीही
प्रसारमाध्यमांशी बोलताना रजनीकांत यांनी माझ्यासाठी हा दिवस फार महत्त्वाचा आहे. मला लोकांचे प्रेम आणि त्यांच्या पाठिंब्यामुळे भारत सरकारकडून दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाल्याचे ते म्हणाले. सोहळय़ादरम्यान आपल्या एका डोळय़ात आसू आणि एका डोळय़ात हसू आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली. हा प्रति÷sचा पुरस्कार घेताना माझे गुरु केबी म्हणजे के बालचंदर सर आपल्यात राहिले नाहीत याचे दुःख आहे. तर हा पुरस्कार मिळाल्याचा आनंदही आहे, असे ते म्हणाले.
प्रादेशिक विजेत्यांचाही गौरव
राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मनोज वाजपेयी आणि धनुष यांना ‘भोसले’ आणि ‘असुरन’मधील भूमिकेसाठी संयुक्तपणे सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे. ‘स्पेशल मेन्शन पुरस्कारां’मध्ये चार चित्रपटांची निवड झाली असून ‘बि?र्याणी’ (मल्याळम), ‘जोनाकी पोरबा’ (आसमि?या), ‘लता भगवान करे’ (मराठी), ‘पि?कासो’ (मराठी) यांनी बाजी मारली आहे. सामाजिक हक्कांवर आधारित चित्रपटासाठी ‘होली राईट्स’ (हिंदी), ‘लाडली’ (हिंदी) यांचा गौरव झाला असून सर्वोत्कृष्ट पर्यावरण विषयक चित्रपट म्हणून ‘द स्टॉर्क सेवियर्स’ला बहुमान मिळाला. बी. प्राक (तेरी मिट्टी- केसरी) हे सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक ठरले असून सावनी रविंद्र (रान पेटलं) यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा सन्मान प्राप्त झाला आहे.









