47 वर्षांची झाली बॉलिवूडची अभिनेत्री
बॉलिवूड अभिनेत्री रविना टंडन मंगळवारी 47 वर्षांच झाली आहे. कन्या राशासोबत तिने अमेरिकेत स्वतःचा वाढदिवस साजरा केला आहे. राशाने स्वतःयच आईसाठी एका पार्टीचे नियोजन केले होते. मी वाढदिवसाच्या पार्टीजचा आनंद घेत नाही. माझ्यासाठी हा दिवस स्वतःच्या कुटुंबासोबत साजरा करणे अधिक चांगले सेलिब्रेशन असल्याचे रविनाने म्हटले आहे.
यंदाचा वाढदिवस निश्चितपणे रोमांचक आणि काहीसा वेगळा ठरला आहे. मी स्वतःच्या मुलीसोबत अमेरिकेत वाढदिवस साजरा करतेय. आम्ही येथे तिच्यासाठी योग्य विद्यापीठाचा शोध घेतोय. पण मी माझा मुलगा आणि पतीला मिस करतेय असे रविनाने सांगितले आहे. रविनाचे पती अनिल थदानी आणि मुलगा रणबीर अमेरिकेतून भारतात परतले आहेत.
यंदाच्या वाढदिनी माझा सर्वात मोठा संकल्प मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारे स्वतःच्या आरोग्यासाठी समर्पित राहणे असणार आहे. याचबरोबर मी स्वतःच्या कामाबद्दल नेहमी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करणार असल्याचे रविनाने म्हटले आहे.









