एमआयडीसी परिसरात घटना : 62 हजारांचे तीन मोबाईल लंपास
प्रतिनिधी/ सातारा
साताऱयात दि. 6 रोजी मोबाईल चोरीच्या पाच घटनाबाबत पाच तक्रारी झाल्यानंतर दि. 7 रोजी देखील 61 हजार 500 रुपये किंमतीचे तीन मोबाईल अज्ञात चोरटय़ाने एमआयडीसी परिसरातील तीन घरातून चोरुन नेले आहेत. मोबाईल चोरटय़ांच्या धुमाकुळाने नागरिक हैराण झाले असून याबाबत साताराशहर पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 7 एप्रिल ते 25 जुलै या कालावधीत बारावकरनगरातील एका घरात शिरुन चोरटय़ाने तक्रारदार सागर सूर्यकांत ताटे (रा. बारावकरनगर, पोलीस कॉलनी, एमआयडीसी, सातारा) यांच्या पत्नीचा मोबाईल चोरुन नेला आहे. तर समर्थनगर येथील निशीगंधा कॉलनीतील रामचंद्र घाडगे तसेच आनंदनगर हौसिंग सोसायटी, संभाजीनगर, सातारा येथील देवेंद्र दिलीप देशमुख यांच्या घरातून दोन मोबाईल असे एकूण 61 हजार 500 रुपये किंमतीचे तीन मोबाईल अज्ञात चोरटय़ांनी लंपास केले आहेत.
दि. 6 रोजी मोबाईल चोरीच्या पाच तक्रारी तर दि. 7 रोजी तीन अशा प्रकारे 8 मोबाईल सातारा शहर व परिसरात चोरटयांनी घरातून लंपास केले आहेत. थेट घरात जावून मोबाईल चोरी करणाऱया चोरटय़ांमुळे नागरिकांना त्रास सुरु असून या चोरटय़ांना जेरबंद करण्याचे आव्हान शहर पोलिसांसमोर आहे. याबाबत पुढील तपास पोलीस नाईक सुतार अधिक तपास करत आहेत.








