फिरायला जाणाऱया महिलांमध्ये भितीचे वातावरण
प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहरातील करंजे व सदरबझार या परिसरात दोन अज्ञात इसमांनी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र धुमस्टाईलने चोरून नेले. या चेनस्नेचिंगचा गुन्हा शाहूपुरी व शहर पोलीस ठाण्यात दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, करंजे येथील काळेगल्ली ते झेंडा चौक या रस्त्याने दि. 6 रोजी 6 वाजण्याच्या सुमारास पुनम सुनिल जाधव (वय 29) या चालत निघाल्या होत्या. यावेळी मोटार सायकलवरून आलेल्या दोन चोरटय़ापैकी मागे बसलेल्या चोरटय़ाने पुनम यांच्या गळ्यातील पावणेदोन तोळ्याचे 70 हजार रूपये किंमतीचे मंगळसूत्र हिस्कावून नेले. अशीच चोरीचा घटना सदरबझार येथील कांगा कॉलनीत घडली. याच दिवशी सायंकाळी 6.30 वाजण्याच्या सुमारास कांगा कॉलनी येथील रस्त्यावरून उषा दादासाहेब सरकाळे (वय 56) या चालत निघाल्या होत्या. यावेळी दोन अज्ञात चोरटय़ांनी त्यांचे 40 हजार रूपये किंमतीचे मंगळसूत्र हिस्कावून नेले. या एकाच दिवशी घडलेल्या घटना आहेत. यामुळे महिलांमध्ये भितीचे वातावरण आहे. पोलिसांनी रात्रीसह दिवसाही पेट्रोलिंग वाढविण्याची मागणी होत आहे. या दोन्ही मंगळसूत्र चोरटय़ाविरूद्ध सातारा शहर व शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस चोरटय़ांचा तपास करत आहेत.








