मंत्रीमहोदयांची उपस्थितीत आज साताऱयात शिवसेनेचा मेळावा
प्रतिनिधी/ सातारा
सातारा नगरपालिका निवडणुकीचे बिगुल काही दिवसांपासून वाजू लागले असून आता शिवसेनेने देखील निवडणुकीत उडी घेण्याचा निर्णय घेतला असून त्या अनुषंगाने सातारा शहरातील शिवसैनिक व शिवसेना पदाधिकाऱयांचा मेळावा सोमवार दि. 4 रोजी दुपारी 2 वाजता साताऱयातील समर्थ मंदिर येथील दैवज्ञ मंगल कार्यालयात होणार असल्याची माहिती शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख व मेळाव्याचे संयोजक सचिन मोहिते यांनी दिली.
या मेळाव्यास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून शिवसेना उपनेते नितीन बानगुडे-पाटील या मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.
यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुगा यशवंत घाडगे, जिल्हा संघटिका शारदाताई जाधव, युवासेनेचे जिल्हाध्यक्ष रणजीतसिंह भोसले, क्षेत्रप्रमुख एस. पार्टे गुरुजी, सातारा विधानसभा संपर्कप्रमुख एकनाथ ओंबळे यांच्यासह उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते, सातारा तालुका प्रमुख अनिल गुजर, आतिष ननावरे, जावली तालुकाप्रमुख विश्वनाथ धनावडे, सातारा शहरप्रमुख बाळासाहेब शिंदे, निलेश मोरे, मेढा शहरप्रमुख सचिन जवळ सातारा तालुका संघटक अमर मोहिते, प्रणव सावंत, संघटिका रुपा लेंभे, मंजिरी सावंत, युवासेना तालुकाप्रमुगा महेश शिर्के उपस्थित राहणार असून शिवसेनेच्या सर्व आजी, माजी पदाधिकारी व शिवसैनिकांनी मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन सचिन मोहिते यांनी केले आहे.









