प्रतिनिधी/ सातारा
भारतीय जनता पार्टीतर्फे सातारा शहरात सेवा व समर्पण अभियान सुरु असून या अंतर्गंत भाजपच्या ओबीसी मोर्चा युवती जिल्हाध्यक्ष वनिता पवार यांच्यावतीने प्रभाग क्रमांक 19 मधील नगरपालिका वसाहतीत स्वच्छता अभियान राबवून तेथील नागरिक व महिलांना मोफत मास्क, सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.
भारतीय जनता पार्टीतर्फे सेवा आणि समर्पण हे अभियान 17 सप्टेंबरपासून सुरु असून ते 7 ऑक्टोबर पर्यंत सुरु राहणार आहे. या अभियानाअंतर्गत साताऱयात स्वच्छता मोहीम, लसीकरण मोहीम, विविध प्रकारच्या आरोग्य शिबिरे, स्वच्छता अभियान, प्लास्टिक मुक्त भारत शपथ, सिंगल युज प्लास्टिक न वापरण्याबाबत आवाहन, कोविड संबंधित समुपदेशन करणे, कापडी पिशव्या, मास्क, सॅनिटायझर वाटप असे उपक्रम सुरु असल्याचे भाजप महिला मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष सुवर्णाताई पाटील यांनी सांगितले.
या कार्यक्रमास भाजपा शहराध्यक्ष विकास गोसावी, जिल्हा सरचिटणीस विठ्ठल बलशेटवार, ओबीसी जिल्हाध्यक्ष गीता लोखंडे, जिल्हा उपाध्यक्ष ऍड. प्रशांत खामकर, उपाध्यक्ष राहुल शिवनामे, सरचिटणीस जयदीप ठुसे, नगरसेवक विजय काटवटे, कलाकार आघाडी जिल्हाध्यक्ष विकास बनकर, व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष डॉ सचिन साळुंखे, युवा जिल्हाध्यक्ष महेंद्र कदम, माजी नगराध्यक्ष सचिन सारस, शहर उपाध्यक्ष वैशाली टंगसाळे, उपाध्यक्ष प्रशांत जोशी, महिला मोर्चा शहराध्यक्षा रिना भणगे, शहर उपाध्यक्ष अश्विनी हुबळीकर, महिला मोर्चा शहर सरचिटणीस, हेमांगी जोशी, ओबीसी युवा जिल्हा सरचिटणीस पायल टंगसाळे, व्यापारी आघाडी जिल्हा उपाध्यक्ष राजेश माजगावकर, ओबीसी उपाध्यक्ष सुरेखा धोत्रे, तसेच नगरपालिका कर्मचारी वसाहतीतील महिला व नागरिक आदी उपस्थित होते. नगरसेवक सुनील काळेकर यांनी सूत्रसंचालन केले.









