पदाधिकारी, अधिकाऱयांच्या केबीनमध्ये फॅन, लाईट सुरुच
प्रतिनिधी/ सातारा
सातारा जिल्हा परिषदेच्या दोन्ही इमारतीला विद्युत पुरवठय़ासाठी महिन्याकाठी तब्बल अडीच लाख रुपयांचे बील येते. ते बील सर्वसामान्यांच्या करातूनच भरले जाते. परंतु जिल्हा परिषदेमध्ये अनेक पदाधिकारी, अधिकारी यांच्या केबीनमध्ये फॅन, लाईट या केबीनमध्ये कोणी नसताना सुरु असतात. त्यामुळे लाईटचा अपव्यव होतोच तसेच बहुतांशी ठिकाणी चतुर्थश्रेणी कर्मचारी गणवेश विनाच डय़ुटीवर दिसत होते. त्यामुळे जिल्हा परिषदेत नियमांची एwसितैसीच दिसत होती.
सातारा जिल्हा परिषदेमध्ये नियम फक्त सर्वसामान्यांसाठी असतात. पदाधिकारी व शासकीय कर्मचारी, अधिकारी यांच्यासाठी नसतात. त्याचा प्रत्यय वारंवार येतो. जिल्हा परिषदेमध्ये अनेक अधिकारी व कर्मचारी हे त्यांच्या टेबलवर नसतात. तर काही चतुर्थश्रेणी कर्मचारी हे त्यांना दिलेल्या गणवेशात दिसत नाहीत. रंगीत कपडय़ात डय़ुटीवर असतात. त्यामुळे ते चतुर्थश्रेणी कर्मचारी आहेत की अधिकारी आहेत हेच नागरिकांना समजत नाहीत. दरम्यान, चतुर्थश्रेणी कर्मचाऱयांना गणवेशाकरता दोन वर्षातून एकदाच दोन ड्रेसकरता गणवेशभता दिला जातो. तोही काही कर्मचाऱयांना मिळाला नाही असे सांगण्यात आले. जिल्हा परिषदेत अनेक विभागात हे चित्र आहे.
तसेच अनेक अधिकारी आणि पदाधिकाऱयांच्या केबीनमध्ये फॅन, लाईट तशीच सुरु असते. केबीनमध्ये कोणीही नाही तरी एसी सुरु असतो. असाच प्रकार जिल्हा परिषदेत वारंवार घडतो. दरम्यान, जिल्हा परिषदेमधील दोन्ही इमारतीमधील लाईटचे बील हे अडीच लाख रुपये येते. पदाधिकारी, अधिकारीच जर वीजेची बचत करत नसतील तर सर्वसामान्यांकडून अपेक्षा काय राहणार असा सवाल सर्वसामान्य नागरिक उपस्थित करु लागले आहेत.








