रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद, १६८ जणांनी केले रक्तदान
प्रतिनिधी/नागठाणे
पोलीस हा केवळ कायदा-सुव्यवस्थाच राखत नाही तर वेळप्रसंगी सामाजिक बांधिलकी जपण्यात व समाजपयोगी कामातही अग्रेसर असतो हे नुकतेच सातारा तालुक्यातील बोरगाव पोलीस ठाण्याच्या अधिकारी व कर्मचारीवर्गाने दाखवून दिले आहे. कोरोना साथरोगाच्या काळात रक्तदानाची गरज ओळखून सातारा जिल्हा पोलिस दलाच्या माध्यमातून बोरगाव पोलिसांनी स्वयंस्फूर्तीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरास परिसरातील गावांमधून उत्फुर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात १६८ जणांनी रक्तदान केले.
बोरगाव पोलीस ठाण्याचा कार्यभार स्विकारल्यापासून स.पो.नि. डॉ. सागर वाघ यांनी आपल्या वेगळ्या कार्यशैलीची ओळख निर्माण केली आहे. परिसरातील गावांमधून कायदा- सुव्यवस्था राखण्याबरोबरच नागरिकांना सहकार्याची भूमिकाही त्यांनी घेतली आहे. पोलीस हा केवळ गुन्हे दाखल करणे व तपास करणे एवढ्यासाठी नसून पोलीस हा सामाजिक कार्यातही पुढे असतो हे त्यांचे मत आहे. आणि हेच चित्र या शिबिराच्या माध्यमातून त्यांनी उभे केले.
स्वतः डॉक्टर असलेल्या सागर वाघ यांना रक्तदानाचे महत्वही माहीत आहे.आणि त्यामुळेच त्यांनी नुकतेच नागठाणे (ता.सातारा) येथे जिल्हा पोलिस डाळ बोरगाव पोलीस ठाण्याच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन केले. येथील जिल्हा परिषदेच्या केंद्रशाळेत हे शिबीर पार पडले.या शिबिराला बोरगाव परिसरातल्या गावांमधून मोठा प्रतिसाद लाभला. प्रामुख्याने युवा वर्गाने यावेळी भरघोस प्रतिसाद दिला.१६८ जणांनी या शिबिरात रक्तदान केले. यामध्ये महिला वर्ग व पोलीस ठाण्याच्या कर्मचार्यांचाही सहभाग होता. सातारा येथील बालाजी ब्लड बैंक व अक्षय ब्लड बैंकेने यावेळी मोलाचे सहकार्य केले. जिल्हा पोलिस प्रमुख अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी बोरगाव पोलिसांच्या कार्याचे कौतुक केले तर सहायक पोलिस अधीक्षक आंचल दलाल यांनी आवर्जून या रक्तदान शिबिरास भेट देऊन पाहणी करत मार्गदर्शन केले.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









