उद्यमबागमधील प्रकार, तक्रार करूनही दुर्लक्ष : रस्त्यावर सांडपाणी
प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील गटारींची स्वच्छता आणि बांधकाम करण्यावर महापालिका प्रशासनाने भर दिला आहे. पण उद्यमबाग परिसरातील गटारी आणि वाहणाऱया सांडपाण्याच्या समस्या निवारण्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. उद्यमबाग औद्यागिक वसाहत परिसरातील गटारीचे पाणी व्यवस्थित वाहत नसल्याने रस्त्यावर साचून रहात आहे. परिणामी येथील छोटय़ा उद्योजकांना सांडपाण्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे
औद्यागिक वसाहतीमधील एका हॉटेलचे सांडपाणी गटारीमध्ये सोडण्यात आले आहे. पण सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याने सांडपाणी पॅसेजमधील रस्त्यावर साचत आहे. दोन इमारतींच्या मध्यभागी रस्ता सोडण्यात आला आहे.
तसेच याठिकाणी लहान व्यावसायिकांच्या लेथमशिन्स असल्याने छोटे उद्योजक ये-जा करीत असतात. पण गटारीची स्वच्छता व्यवस्थित करण्यात येत नसल्याने सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नाही. परिणामी सांडपाणी रस्त्यावर साचून रहात आहे. सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होण्यासाठी तसेच हॉटेलचे सांडपाणी व्यवस्थित होण्यासाठी गटार स्वच्छ करण्याची सूचना करण्यात येते. पण हॉटेल चालकांकडून कोणतीच कारवाई केली जात नसल्याने रस्त्यावर सांडपाणी साचून रहात आहे.
याचा त्रास उद्योजकांना होत आहे. तसेच सांडपाण्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. परिसरातील व्यावसायिकांना डासांचा उपद्रव सहन करावा लागत आहे. परिणामी उद्योजकांचे आरोग्य धोक्मयात आले आहे. त्यामुळे येथील समस्येवर तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी होत आहे.









