प्रतिनिधी / आटपाडी
जातिवंत माडग्याळ जातीच्या अवघ्या दिड महिन्याच्या बकऱ्याची (लव्हार) तब्बल ७० हजारांत विक्री झाली. आटपाडी-भिंगेवाडी येथील आप्पा खरात यांच्या छोट्या बकऱ्याची मासाळवाडीच्या धोंडीराम सरगर यांनी मोठ्या किंमतीला खरेदी केल्यानंतर फटाक्यांची आतषबाजी, हलगीचा कडकडाट आणि गुलालाची उधळण करत बकर्यासह मेंढपाळ शेतकर्यांनी जल्लोष केला.
आटपाडी तालक्यात आजही अनेकांचा मेंढीपालन हा मख्य व्यवसाय आहे, शेतीशी निगडीत या मेंढीपालनातन अनेकांचे संसार उभे राहिले असन हजारो कुटुंबांची गुजरान या मेंठ्या पालनातुन होत आहे. अनेक हौसे मेंढपाळ आपल्या जातिवंत जनावरांची निगा उच्चप्रतीमध्ये राखून त्याची लाखोंच्या दरात विक्री करत आहेत. असाच एक व्यवहार आटपाडीसह तालुक्यात आणि जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे.
आटपाडी तालुक्यातील भिंगेवाडी येथील आप्पा खरात यांचे अवघे दीड महिने आर्यमान असलेल्या मेंढा ७० हजार रूपयांत विक्री झाला. खरात यांच्याकडील एक माडग्याळी जातीची मेंढी असून तिची पिले सुरेख आणि योग्य नाकाची जातिवंत आहेत. त्यातील एक मेंढा (लव्हार) धोंडीराम सरगर यांनी खरेदी केली. अवघ्या दीड महिन्याचे वय असणारे मेंढा माजी जि प सदस्य तानाजी पाटील अॅड. धनंजय पाटील, साहेबराव पाटील, पै. संतोष पुजारी आदिंच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला.
दोन्ही मेंढपाळांचे तानाजी पाटील यांनी गौरव करत सत्कार केला. दिलीप पुजारी, नंदकुमार कदम, मोहन पुजारी, चंद्रकांत तळे, सुरेश जाधव, दादा पुजारी, शिवाजी हजारे सोमा माळी, रोहित हाके, सुनिल भिंगे नाना पूजारी, शिवाजी हजारे, उत्तम घमे, वसंत तळे नवनाथ पूजारी यांच्यासह अनेक मेंढपाळ व शेतकऱ्यांनी या बकर्यासह दोन्ही मेंढपाळ बांधवांचे कौतुक केले. या प्रसंगी फटाक्यांची आतिषबाजी करत गुलालाचीही उधळण करून दोन्ही मेंढपाळांनी आनंदोत्सव साजरा केला.
अनेक जातिवंत मेंढ्या, बकरे यांची लाखो रूपयांत विक्रीचा आटपाडी तालुक्याला इतिहास आहे. कार्तिक यात्रेत आजपर्यंत अशी कोट्यावधीची उलाढालही झाली आहे. आत्ता येणाऱ्या यात्रेवर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे महाराष्ट्र कर्नाटक राज्यात प्रसिध्द असणारी जनावरांची कार्तिक यात्रा भरवावी, अशी मागणी
याप्रसंगी शेतकऱ्यांनी तानाजी पाटील यांच्याकडे केली. येणाऱ्या कालावधीत कोरोनाचे संकट कमी झाल्यास निश्चित यात्रेबाबत दिलासा मिळेल, अशी ग्वाही तानाजी पाटील, ऍड. धनंजय पाटील यांनी याप्रसंगी दिली








