प्रतिनिधी/ रत्नागिरी
रत्नागिरी शहर पोलिसांकडून सराईत दुचाकी चोरटय़ाला अटक करण्यात आली आह़े हेमंत प्रमोद दसाई (28, ऱा चारकोप कांदिवली) असे या संशयिताचे नाव आह़े राज्यभरात त्याच्यावर 14 हून अधिक दुचाकी चोरीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आह़े रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्येही चोरी केल्याची कबुली संशयित आरापीने दिली आह़े
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरालगतच्या उद्यमनगर येथे दुचाकी चोरीला गेल्याची घटना घडली होत़ी संतोष विष्णू मोहिते (32, ऱा उद्यमनगर रत्नागिरी) यांनी तक्रार दाखल केली होत़ी त्यानुसार 13 जानेवारी रोजी संतोष मोहिते यांनी आपल्या मालकीची दुचाकी (एमएच 08 एजे 2931) घरासमोरील जागेत उभी केली होत़ी दरम्यान शुक्रवारी रात्री चोरटय़ाने दुचाकी चोरून नेल्याची तक्रार मोहिते यांनी दाखल केली होत़ी या गुह्याचा तपास करताना रत्नागिरी शहर पोलिसांनी हेमंत देसाईला ताब्यात घेतल़े त्याच्याकडून चोरीला गेलेली दुचाकी पोलिसांकडून जप्त करण्यात आल़ी पोलिसांकडून करण्यात आलेल्या तपासात देसाईविरूद्ध विविध पोलीस ठाण्यत एकूण 14 गुन्हे दाखल आहेत़ यात चोरीच्या गुह्यांबरोबरच खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा चारकोप पोलीस ठाण्यात दाखल असल्याची माहिती समोर आली आह़े हेमंत देसाई याला शुक्रवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल़ी









