जूनच्या तुलनेत हा आकडा 13 टक्क्यांनी अधिक
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
देशात पुन्हा एकदा रोजगार वाढू लागला आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेशी (ईपीएफओ) सप्टेंबर 2021 मध्ये 15.41 लाख लोक जोडले गेले आहेत. ऑगस्ट 2021 च्या तुलनेत हा आकडा 13 टक्क्यांनी अधिक आहे. ऑगस्टमध्ये 13.60 लाख नवे सदस्य जोडले गेले होते.
रोजगाराच्या बहुतांश संधी महाराष्ट्र, हरियाणा, गुजरात, तामिळनाडू, कर्नाटकात निर्माण झाल्या आहेत. या राज्यांमधून एकूण 9.41 लाख सदस्य जोडले गेले आहेत. एकूण प्रमाणात या राज्यांची हिस्सेदारी सुमारे 61 टक्के इतकी आहे. तर नव्या सदस्यांमध्ये महिलांचे प्रमाण 3.2 लाख इतके राहिले आहे.
22-25 वयोगटातील नव्या सदस्यांची संख्या सर्वाधिक आहे. या वयोगटातील सदस्यांची संख्या 4.12 लाख आहे. त्यानंतर 18-21 वयोगटातील सदस्यांची संख्या 3.18 लाख आहे. यातून पहिल्यांदाच नोकरी करणाऱया लोकांची संख्या खूप मोठी असल्याचे दिसून येते.
ईपीएफओमध्ये दर महिन्याला सरासरी 7 लाख नवे सदस्य जोडले जातात. 202-21 मध्ये एकूण 77.08 लाख नवे सदस्य ईपीएफओमध्ये जोडले गेले होते. ईपीएफओकडून प्रसिद्ध आकडेवारीनुसार 2019-20 या आर्थिक वर्षात 78.58 लाख नव्या सदस्यांची भर पडली होती. तर 2018-19 या आर्थिक वर्षात हा आकडा 61.12 लाख राहिला होता.









