भारतीय वायुदलाकडून अपगेड करण्याची तयारी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
फ्रान्सकडून जवळपास 30 राफेल लढाऊ विमाने प्राप्त केल्यावर भारतीय वायुदल आता जानेवारी 2022 पासून या लढाऊ विमानांच्या या ताफ्याला भारताच्या दृष्टीकोनातून याच्या सामर्थ्यात वाढ करण्यासाठी त्याला अपगेड करणार आहे. याच उद्देशाने भारतीय वायुदलाच्या अधिकाऱयांचे एक उच्चस्तरीय पथक फ्रान्समध्ये आइस्ट्रेस वायुतळावर टेल नंबर आरबी-008 सोबत परीक्षण करण्यात आलेल्या विमानाच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यासाठी पोहोचले ओ.
2016 च्या करारात दोन्ही देशांदरम्यान झालेल्या सहमतीनुसार इंडियन स्पेसिफिक इनहान्समेंट्स’ने विमानांना युक्त करण्यात आले आहे. वायुदलाकडून या विमानांचा स्वीकार करण्यात आल्यावर त्यांना अधिक सक्षम करण्यासाठी त्यांचे अपग्रेडेशन जानेवारीपासून सुरू करण्याची योजना असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.
भारत आणि फ्रान्समधील करारानुसार वायुदलाला 36 राफेल लढाऊ विमाने प्राप्त होणार आहेत. लढाऊ विमाने प्रथम फ्रान्समध्ये भारतीय वायुदलाला सोपविली जातात आणि मग ती भारतात पाठविण्यात येतात. 5 राफेल विमानांची पहिली खेप मागील वर्षी 29 जुलै रोजी भारतात पोहोचली होती.
इंडियन स्पेसिफिक इनहान्समेंट्समध्ये भारतीय गरजांनुसार अत्याधिक सक्षम क्षेपणास्त्रs, लो बँड जॅमर आणि उपग्रह दूरसंचार प्रणालींचे एकीकरण सामील आहे. भारताला यातील सुमारे 30 राफेल विमाने पूर्वीच प्राप्त झाली आहेत आणि त्यातील 3 विमाने 7-8 डिसेंबर रोजी भारतात पोहोचणार आहेत.
करार वेळापत्रकानुसार किट फ्रान्समधून आणले जाईल आणि दर महिन्याला तीन ते चार भारतीय राफेल विमानांना आयएसई मानकांमध्ये अपग्रेड करण्यात येते. फ्रान्समधून भारतात येणारे अखेरचे विमान आरबी-008 असेल. याचे नाव माजी वायुदलप्रमुख एअर चीफ मार्शल (सेवानिवृत्त) आरकेएस भदौरिया यांच्या नावावर ठेवले जाईल. भदौरिया यांनी फ्रान्ससोबत करार करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली होती.









