डिजिटल पदार्पणातून करणार धमाल
सनी देओल सध्या राजकारण आणि चित्रपटक्षेत्रातील कारकीर्द दोन्हींमध्ये संतुलन राखून आहेत. याचदरम्यान सनी आता लवकरच डिजिटल पदार्पण करणार असल्याचे वृत्त आहे. झी5 प्रॉडक्शनसह डिजिटल पदार्पण करणाऱया सनी यांनी ‘जी 49’ या सीरिजचे चित्रिकरणही सुरू केले आहे. मुंबईतील मड आयलँडमध्ये हे चित्रिकरण चालू आहे.
बॉबी देओल यांना डिजिटल पदार्पणातून मिळालेले यश पाहता सनी यांनी त्यांचे अनुकरण करण्याचा निर्णय घेतला असावा. बॉबी यांना आश्रम सीरिजनंतर अनेक चित्रपटांच्या ऑफर्स मिळत आहेत.
सनी देओल 2019 मध्ये ‘ब्लॅक’ या चित्रपटात दिसून आले होते. त्यानंतर ‘पल पल दिल के पास’ चित्रपटाद्वारे त्यांनी दिग्दर्शकीय कौशल्यही पडताळून पाहिले आहे. या चित्रपटातून सनी यांचा पुत्र करणने या क्षेत्रात पदार्पण केले होते. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर छाप पाडू शकला नव्हता.









