वार्ताहर/कुडची
चिंचली येथे आयोजित श्री महाकाली चॉम्पियन चषकाचे मानकरी कोल्हापूर येथील बालगोपाल स्पोर्टस् क्लबने पटकाविला आहे.
आमदार अशोकराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली चिंचली येथे राष्ट्रीय स्तरावरील फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या अंतिम सामन्यात कोल्हापूरचे दोन्ही संघ आमने-सामने होते. बालगोपाल संघाविरोधात न्यू शिवाजी तरुण मंडळ यांच्यात सामना रंगला होता. शिवाजी तरुण मंडळाच्या गोपीने पहिला गोल करून आघाडी मिळवून दिली. पण बालगोपाल क्लबच्या खेळाडूने पहिल्या हाफच्या काही वेळेपूर्वी गोल करून सामना बरोबरीत आणला. अंतिम वेळेपर्यंत सामना बरोबरीत राहिला.
दरम्यान, बोलताना प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असलेले मि. इंडिया सुनिल आपटेकर यांनी, आमदार विवेकराव पाटील यांनी ग्रामीण भागात राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा भरविल्याबद्दल गौरोद्गार काढले. यामुळे ग्रामीण भागातही हा श्रीमंत व शहरी खेळ रुजवेल. आपल्या विशाल देशात खेळाडुंना सुविधा मिळत नसल्याने पदके मिळेनासे झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
या स्पर्धेत सुमारे 21 संघानी भाग घेतला होता. यात केरळा, मुंबई, कोडगु, कोल्हापूर, गडहिंग्लज, मिरज, बेळगाव, रायबाग, निपाणी, जमखंडी, गोकाक, हुबळी, बेंगळूर येथील संघ सहभागी झाले होते. रेफरी म्हणून ईब्राहिम, दर्शन, शामसुंदर, शिकलगार अनिल, योगेश हिरेमठ यांनी कार्य केले.
मान्यवरांच्या हस्ते प्रथम व द्वितीय क्रमांक पटकाविलेल्या संघाला रोख पारितोषिक व चषक देण्यात आले. यावेळी आमदार विवेकराव पाटील, डॉ. सी. बी. कुलगोड, चिंचली नगर पंचायतीचे महादेव पडोलकर, जितेंद्रराव जाधव सरकार, डी. एस. डीग्रज, रवि मालशेट यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संभाजी चव्हाण, राजू बनगे, झाकीर तरडे, भिमू बनगे, आदर्श पुजारी, विश्वनाथ पाटील, सनित पुजारी, जुबेर अरळीकट्टी सह अनेकांनी सहकार्य केले. कुडची पालिसांच्यावतीने बंदोबस्त ठेवण्यात आला होता. समाना पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.









