100 हून अधिक स्पर्धकांचा सहभाग : रामनाथ मंगल कार्यालयात स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव जिल्हा शरीरसौ ष्टव संघटना व मध्यवर्ती सार्वजनिक श्री गणपती उत्सव मंडळ झेंडा चौक यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नाकर शेट्टी 17 व्या श्रीगणेश जिल्हास्तरीय शरीरसौ ष्टव स्पर्धेला मोठय़ा उत्साहात प्रारंभ झाला.
रामनाथ मंगल कार्यालय येथे होत असलेली ही स्पर्धा कै. रत्नाकर शेट्टी यांच्या स्मरणार्थ आयोजिण्यात आली आहे. आयबीबीएफच्या नियमानुसार 55, 60, 65, 70, 75, 80, 80 किलोवरील गटात घेण्यात येत आहे.
या स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून मोतीचंद दोरकाडी, अमित किल्लेकर, राजू हंगिरगेकर, मिलिंद पाटणेकर, मि. इंडिया सुनील आपटेकर, एशियन पंच अजित सिद्दण्णावर, हरिष हंगिरगेकर, नितीन हंगिरगेकर, उमा महेश आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष अमित किल्लेकर यांच्या हस्ते महाबली हनुमान, छत्रपती शिवाजी महाराज, गणेश मूर्ती व लोकमान्य टिळकांच्या मूर्तींचे पूजन करण्यात आले. या स्पर्धेत 100 हून अधिक स्पर्धकांनी भाग घेतला आहे. यावेळी एम. के. गुरव, गंगाधर एम., प्रकाश पुजारी, हेमंत हावळ, अनंत लंगरकांडे, नूर मुल्ला, सुनील पवार, बसवराज अरळीमट्टी यांनी पंचांची भूमिका बजावली.









