क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव जिल्हा शरीरसौष्टव संघटना व रॉ फिटनेस जिम यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या ‘मि. रॉ फिटनेस’ टॉप टेन शरीरसौष्टव स्पर्धेत भावेश भोसले याने पहिला मि. रॉ फिटनेस हा मानाचा किताब पटकाविला.
रामनाथ मंगल कार्यालय येथे आयोजित या स्पर्धेचे उद्घाटन मोतीचंद दोरकाडी, अमित किल्लेकर, राहुल हंगिरगेकर, मिलिंद पाटणेकर, भुपेंद्र पटेल, रवी सिद्दण्णावर, नितीन हंगिरगेकर, हरिष हंगिरगेकर यांच्या हस्ते हनुमान व श्री गणेश मूर्तीचे पूजन करून करण्यात आले. रॉ जिम मर्यादित टॉप टेन स्पर्धेत एकूण 20 स्पर्धकांनी भाग घेतला होता.
या स्पर्धेत भावेश भोसले याने मि. रॉ हा किताब पटकाविला. राहुल हणमंताचे याने दुसरा, विक्रम गौडरने तिसरा, मोहन जाटने चौथा, ओमकार लंगरकांडेने पाचवा, सूरज तोरीने सहावा, रितेश पाटीलने सातवा, सागर नाईकने आठवा, रोहित मोरेने नववा तर सुनील गुंजाळने दहावा क्रमांक पटकाविला.
प्रमुख पाहुणे मि. इंडिया सुनील आपटेकर, अजित सिद्दण्णावर, प्रकाश पुजारी, राहुल मुचंडी, युवराज हावळ, अतुल पाटील, गंगाधर एम., शिवाजी माने, विशाल बिर्जे, अरविंद घाडगे, सुहास सैबण्णावर, विजय चौगुले, अतुल शिरोले यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना पदके, चषक, प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी पंचांची भूमिका हेमंत हावळ, अनंत लंगरकांडे, नूर मुल्ला, सुनील पवार, बसवराज अरळीमठ, उमाशंकर यांनी तर स्टेज मार्शल म्हणून सुनील राऊत यांनी काम पाहिले.









