मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन : गोवा विद्यापीठात राज्य शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात
प्रतिनिधी /पणजी
देशाचा इतिहास घडविण्यात शिक्षकांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. शिक्षक केवळ विद्यार्थी घडवत नाहीत तर पिढी घडवतात. हीच घडविलेली पिढी पुढे देशाचे भवितव्य घडवते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केले. ते उच्च शिक्षण संचालनालयाच्या राज्य शिक्षक पुरस्कार वितरण सोहळय़ात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर गोवा राज्याचे सभापती राजेश पाटणेकर, शिक्षण खात्याचे सचिव रवी धवन, उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक प्रसाद लोलयेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले की, देशाचा इतिहास घडविण्यात शिक्षकांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा सन्मान माझ्याहस्ते होतो आहे, ही मला आनंददायी बाब वाटते. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचे स्वागत अ??डिशनल डायरेक्टर डॉ. जर्वासियो एस.एफ.एल मेंडिस यांनी केले. पुरस्कारप्राप्त शिक्षकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत डॉ.जॉर्ज अंबलूर यांनी केले. पुरस्कार प्राप्त शिक्षकांमध्ये प्राचार्य विकास पिसुर्लेकर, प्राचार्य राधिका नायक, प्रो. एम.के जनार्थनम, डॉ. ज्योती पवार यांनी मनोगत व्यक्त केले. आभार अस्टिटंट डायरेक्टर विपूल घारे यांनी मांडले तर सूत्रसंचालन सिद्धी उपाध्ये यांनी केले.
या पुरस्कार प्राप्त शिक्षकांचा झाला सन्मान
- 2018-2019 : डॉ.बी.आर.श्रीनिवासन, डॉ. व्ही?.व्ही.कामत, डॉ. रेखा गावकर, डॉ. विकास पिसुर्लेकर, डॉ. सिस्टर मारिया आराधना.
- 2019-2020 : डॉ. आर.एस.गाड, प्रो.विद्या देसाई, डॉ. सविता केरकर, डॉ. राधिका नायक, डॉ. राजन मॅथ्य?.
- 2020-2021 : डॉ. एम.के.जनार्थनम, डॉ. प्रणब मुखोपाध्याय, डॉ. प्रवीण भेंडे, डॉ. वृ?दा बोरकर, डॉ.सुशीला सावंत मेंडीस
- 2021-2022 : डॉ.कौस्तुभ प्रियोळकर, डॉ.ज्योती पवार, डॉ. एफ.एम.नदाफ, डॉ. संजय सावंत, डॉ.डिलेक्टा डिकॉस्टा.
मुख्यमंत्री म्हणाले की
- गोवा राज्य सरकार संशोधनासाठी अनुदान देते. शिक्षकांनी विशिष्ट विषय घेऊन त्यावर संशोधन करावे. हेच संशोधन राज्याच्या विकासाठी उपयुक्त ठरेल.
- दिष्टावो’ हा भारतातील महत्त्वाचा प्रकल्प असून संपूर्ण या प्रकल्पाने संपूर्ण देशाचे लक्ष वेधले आहे.
- उच्च शिक्षण संचालनालयाने विविध संस्था?शी करार आलेले आहे. त्यामाध्यमातून विद्यार्थ्यांचा नक्कीच विकास होणार आहे.
- पंतप्रधान नरेद्र मोदींच्या नवभारत योजनेचे स्वप्न गोव्यातील विद्यार्थी नक्कीच पूर्णत्वाला नेतील.
शिक्षण घेण्याला वय नसते : सभापती राजेश पाटणेकर
राज्याचे सभापती राजेश पाटणेकर म्हणाले की शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या माध्यमातून राष्ट्र घडवत असतो. पैसा आणि संपत्तीपेक्षा शिक्षण महत्त्वाचे आहे. शिक्षण घेण्यासाठी वयाचे बंधन नाही. जिद्द असलेला माणूस कोणत्याही परिस्थितीत शिक्षण घेऊ शकतो. शिक्षक जरी निवृत्त झाला तरी त्याचे काम चालूच असते.
मुख्यमंत्र्यांकडून उच्च शिक्षण संचालनालयाचे कौतूक
राज्य शिक्षक पुरस्काराचा सोहळा अत्यंत दिमाखदार ठरला. उच्च शिक्षण संचालनालयाने केलेले नेटके नियोजन, आकर्षक सजावट, मंचाची अनोखी मांडणी पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या कार्य-कर्तृत्वाची व्हिडियो सादरीकरणाने दिलेली माहिती तसेच सिद्धी उपाध्ये यांचे बहारदार सूत्रसंचालन यामुळे हा सोहळा अत्यंत दिमखादार झाला. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी उच्च शिक्षण संचालनालयाचे कौतूक केले.









