प्रतिनिधी /पणजी
राज्य सरकार सरकारी नोकऱयांचा लिलाव मांडला असून युवा वर्गाचे भविष्य बरबाद करण्याचा सरकारने घाट घातला आहे. हा प्रकार त्वरीत बंद करा अशी मागणी करीत युवा काँग्रेस ने काल सोमवारी पणजी मोर्चा काढला. काँग्रेस हाऊस कडून सुरु झालेला मोर्चा आल्तीनो येथील मुख्यमंत्र्यांच्या शासकीय बंगल्यावर जाण्याच्या तयारीत असताना पोलासंना त्यांना चर्चचौकात अडवीले. ढोलताशांसह बंद करा बंद करा नोकऱयांची पावणी बंद करा अशा घोषणा देत मोठय़ा प्रमाणात युवक या मोर्चात सहभागी झाले होते.
मडगावचे आमदार दिगंबर कामत, प्रदेशाध्यक्ष गिरीष चोडणकर, महिलाअद्यक्ष बिना नाईक, युवाध्यक्ष वरद म्हार्दोळकर, जनार्दन भंडारी, विजय भिके तसेच इतर काँग्रेस कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते. सरकारी नोकरी पात्र व योग्य उमेदवाराला मिळायला हवी. भाजप सरकार आणि त्यांच्या मंत्र्यांनी या नोकऱयांचा लिलाव मांडला असून पात्र उमेदवारावर अन्याय केला जात आहे. पैसे द्या आणि नोकरी घ्या असाच प्रकार सध्या भाजप सरकार करीत आहे. हा प्रकार त्वरीत बंद झाला पाहिजे अशी मागणी काँग्रेस नेत्यांनी केली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्यातील नोकर भरती घोटाळा प्रकरण उघडकीस आले असून त्याची सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. जे कुणी यात दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे अशी मागणीही काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली आहे. यावेळी पत्रकारांशी बोलताना वरद म्हार्दोळकर म्हणाले की सार्वजनिक बांधकाम खाते तसेच इतर विविध खात्यात मोठय़ाप्रमाणात नोकरभरती केली जात आहे. मात्र या सरकारी नोकऱया योग्य उमेदवारांना सरळ मार्गाने दिल्या जात नसून सरकारी नोकऱयांचा लिलाव मांडला आहे. 30 ते 35 लाख रुपयांना नोकरी विकली जात आहे. गोरगरीबांची मुले पदासांठी योग्य असूनही त्यांना ती नोकरी मिळत नाही. आजचा हा मोर्चा काँग्रेस पक्षाला केवळ राजकीय फायदा मिळविण्यासाठी नसून हा आवाज आहे गोव्यातील सर्वसामान्य युवकांचा त्यांच्या माता पित्यांचा, असेही वरद म्हार्दोळकर म्हणाले.









