हत्तीच्या पिल्लाची आईशी घालून दिली गाठ
छायाचित्राने केले लोकांना भावुक
स्वतःच्या मुलाचा जीव वाचविणाऱया व्यक्तीला आई नेहमीच आठवणीत ठेवते. एका वाट चुकलेल्या हत्तीच्या पिल्लाला वाचवून रेंजर्सनी त्याची त्याच्या आईशी गाठ घालून दिली आहे. हत्तीचे पिल्लू स्वतःच्या आईशिवाय फारकाळ तग धरू शकत नसल्याने वनविभागाच्या कर्मचाऱयांनी अत्यंत वेगाने पावले उचलून त्याचा जीव वाचविला आहे.
आयएफएस अधिकारी सुधारमण नावाने सोशल मीडियावर एक छायाचित्र शेअर करण्यात आले आहे. या छायचित्रात हत्तीचे पिल्लू रेंजरनजीक उभे असल्याचे दिसून येते. एखादा निरागस मूल स्वतःच्या वडिलांकडे जसे उभे राहते तसे हत्तीचे पिल्लू उभे असल्याचे जाणवते. रेंजर अधिकारी प्रसाद आणि त्यांच्या टीमने या हत्तीच्या छोटय़ा पिल्लाची त्याची आई आणि कळपाशी भेट घडवून आणली आहे. या अधिकारी आणि त्याच्या टीमने केलेले हे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे. कुठल्याही कर्तव्यपूर्तीचा गौरव करण्याची सर्वात मोठी पद्धत म्हणजे ते स्मरणात ठेवणे असते. इंटरनेट वापरणारे ही घटना विसरतील, पण त्या पिल्लाची आई सदैव आठवणीत ठेवणार असल्याचे एका युजरने सोशल मीडियावर म्हटले आहे.
वयाच्या 81 व्या वर्षी अनोखी ध्येयासक्ती 282 डोंगर चढण्याचे स्वतःला दिले आव्हान

कुठल्याही उद्देशाशिवाय जगण नीरस ठरते. रिकामीपणा खलू लागतो, आपण केवळ जगतोय असे वाटू लागते. यावर उत्तर मिळणे काहीसे आव्हानात्मक ठरते. कधीकधी उद्देशाशिवाय जगणे मानसिक स्थितीलाही प्रभावित करते. याचमुळे जीवनात नवनवी आव्हाने शोधली अन् स्वीकारली गेली पाहिजेत. स्कॉटलंडचे 81 वर्षीय निक गार्डनर यांची कहाणी तुम्हाला याकरता प्रेरक ठरेल. त्यांनी स्वतःला 282 डोंगर चढण्याचे आव्हान देत वय केवळ एक आकडा असल्याचे दाखवून दिले आहे.
माझ्या पत्नीला 4 वर्षांपूर्वी अल्जाइमर (स्मृतिभ्रम) झाला हाता. पण दोन वर्षांनी मी तिची देखभाल करू शकलो नाही आणि 30 वर्षांच्या सहचर्यानंतर ती अचानक मला कायमस्वरुपी सोडून गेली, तेव्हा माझ्या जीवनात कुठलेच आव्हान नव्हते असे निक यांनी म्हटले.
आतापर्यंत 177 शिखरांवर पोहोचले
याचमुळे वृद्धत्वात त्यांनी स्कॉटलंडच्या सर्व 282 मुनरोस पर्वतांवर चढाई करण्याचे आव्हान स्वीकारले. 3 हजार फुटांची चढाई 1200 दिवसांमध्ये पूर्ण करण्याचे त्यांनी आव्हान स्वीकारले आहे. आतापर्यंत 177 शिखरांचे टोक त्यांनी गाठले आहे. या चढाईमुळे मला काही प्रमाणात जगण्याचा उद्देश गवसला आहे. अन्यथा मी मानसिक आजाराला बळी पडलो असतो असे ते म्हणाले.
पत्नीच्या सन्मानार्थ निधीसंकलन
पत्नी जेनेटच्या (निवृत्त शिक्षिका) सन्मानार्थ निक अल्जाइमर स्कॉटलंड आणि रॉयल ऑस्टियोपोरोसिस सोसायटीसाठी निधी संकलित करत आहेत. दोन्ही संस्थांनी त्यांच्या पत्नीला मोठय़ा प्रमाणात मदत केली होती. निधी जमविण्यासाठी ते कुटुंबीयांसोबत सोशल मीडियाची (फेसबुक आणि इन्स्टाग्राम) मदत घेत आहेत.
दिवसेंदिवस वाढतेय बळ
निक यांनी आतापर्यंत 30 हजार पाउंड (30 लाख रुपयांहून अधिक) जमा केले आहेत. त्यांच्या फंड रेजिंग वेबपेजवर अनेक लोकांचे संदेश येत असतात. लोकांच्या प्रतिसादामुळे त्यांना पुढील वाटचालीची प्रेरणा मिळते. शिखरावर पोहोचल्यावर मी माझ्या सर्व अडचणी विसरून जातो असे ते सांगतात.









