ऑनलाईन टीम / वेंगुर्ला :
भरधाव वेगातील दुचाकीची विजेच्या खांबाला धडक बसल्याने रशियन पर्यटकाचा मृत्यू झाला आहे. आज पहाटे साडेतीनच्या सुमारास वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा राऊतवाडी येथे ही घटना घडली.
संबंधित पर्यटक हा रशियाचा असून, तो आपल्या मित्रांसह भारतात आला होता. मध्यरात्री तो मित्रांसह गोवा केरीच्या दिशेने दुचाकीवरुन जात होता. त्यावेळी भरधाव वेगातील दुचाकी चालकाला रस्त्याच्या बाजूचा विजेचा खांब न दिसल्याने दुचाकी खांबाला धडकली. या धडकेत त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाली होती. त्याला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. शिरोडा पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.









