प्रतिनिधी /बेळगाव
केंद्र सरकारने जाचक कायदे रद्द केले आहेत. त्याप्रमाणे राज्य सरकारनेही कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी शेतकऱयांचा शेतकरी मेळावा झाला. या मेळाव्यात कर्नाटक रयत दलित, कामगार महिला, विद्यार्थी, युवा संघटनेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
प्रारंभी दिल्ली येथील शेतकरी आंदोलनात भाग घेतलेल्या अशोक ढवळी यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन झाले. कणबर्गी रोड येथील संकल्प गार्डनमध्ये हा मेळावा झाला.
यावेळी शेतकरी बांधवांच्या समस्या आणि मागण्यांबाबत चर्चा झाली. सुवर्ण विधानसौधमध्ये भरविलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावेळी आंदोलन छेडण्यात येणार आहे. यावेळी भारतीय कृषी समाजाचे सिद्धगौडा मोदगी, सिरीमने नागराज, एम. शशीधर, कुली विणकर, कामगार संघाचे रवी पाटील, कर्नाटक प्रांत रयत संघाचे टी. यशवंत यासह शेतकरी बांधव नागरिक, विद्यार्थी, कामगार बहुसंख्येने उपस्थित होते.









