कॉमेडी किंग कुशल बद्रिके याच्या आयुष्यातील गर्लप्रेंडची जागा कुणीतरी घेतली आहे कुशलने ही गोष्ट सोशलमीडियावर पोस्ट केली. कुशलच्या बेडवर शेजारी झोपून घोरणारी ही व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून विनोदवीर भाऊ कदम आहे. भाऊच्या वाढदिवशीच कुशलने त्यांचे हे बेडरूम सिक्रेट ओपन करत भाऊच्या घोरण्यावरून घनघोर शुभेच्छा अशी कॅप्शन दिली आहे.

भाऊ कदम आणि कुशल बद्रिके यांचे विनोदाचे पंच ‘चला हवा येऊ दय़ा’ या शोच्या मंचावर नेहमीच हास्याचे फवारे उडवत असतात. एका शूटिंगच्या निमित्ताने झालेल्या प्रवासात कुशल आणि भाऊ यांनी एक रूम शेअर केली. आज भाऊचा वाढदिवस असल्याने ही जोडगोळी आनंदातच होती. शूटिंगमुळे दमलेल्या भाऊने कुशलच्या बेडवरच स्वतःला झोकून दिले आणि भाऊ डाराडूर झाला. पण ती अख्खी रात्र कुशलने जागून काढली. सुंदर प्रेयसी कशी आपली झोप उडवते तशी या प्रेयसीने माझी झोप उडवली आहे असं म्हणत कुशलने घडलेला प्रसंग इन्स्टा पेजवर भाऊला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत शेअर केला. माझ्या आयुष्यातील प्रेयसीची जागा घेणारा हा एकमेव माणूस असं म्हणत एक व्हिडीओही पोस्ट केला आहे. मै जागू तू सो जाए या गाण्याच्या ओळीही कुशलने प्ले केल्या आहेत. कुशलच्या या पोस्टवर चाहत्यांसह सेलिब्रिटी कलाकारांनी हटके प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका चाहत्याने असं म्हटले आहे की कुशल तू या प्रेयसीला भाऊ म्हणतोस हे पाहून मजा वाटली. तर एका चाहत्याने अशी कमेंट केली आहे की तुम्ही दोघांनी मिळून हसवून हसवून सगळय़ा जगाची झोप उडवली आहे.









