किंमत जाणून घेतल्यावर थक्क व्हाल
सोशल मीडिया एक असे प्लॅटफॉर्म आहे, जेथे कधी कुठली गोष्ट व्हायरल होईल कुणीच सांगू शकत नाही. सध्या एक अशी बॅग व्हायरल होत आहे, जी दिसण्यात विमानासारखी अवश्य आहे, पण याची किंमत थक्क करणारी आहे.
एक फॅशन कंपनी अशाप्रकारच्या बॅग्सची विक्री करत आहे. या बॅगची छायाचित्रेही व्हायरल झाली आहेत. पण याची किंमत हैराण करणारी आहे. लोक या बॅगेच्या किमतीची तुलना खऱयाखुऱया विमानाशी करू लागले आहेत.
बॅग उत्पादक कंपनी लुइडस ह्युट्टनने याची किंमत 39 हजार डॉलर्स म्हणजेच सुमारे 28 लाख रुपये ठेवली आहे. परंतु अत्यंत महाग असूनही या विमानाच्या आकारातील हँडबँगची भरपूर चर्चा होत आहे. याचे डिझाइनही अत्यंत जबरदस्त आहे.
या बॅगेत सामग्री ठेवण्यासाठी चांगली जागा असण्यासह याच्यावर बॅगला पकडण्यासाठी सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. एवढेच नाही तर या डिझाइनमधील एक भाग विमानाच्या चाकासारखा दिसेल असा तयार करण्यात आला आहे.
याची छायाचित्रे व्हायरल झाल्यावर लोक विविध प्रकारच्या टिप्पणी करत आहेत. याच्या किमतीत एक खरे विमान मिळणार असल्याचे एका व्यक्तीने म्हटले आहे.









