मुंबई
विदेशी गुंतवणूकदारांनी ऑगस्टमध्ये भारतीय बाजारामध्ये 16 हजार 469 कोटी रुपयांची गुंतवणूक केली असल्याची माहिती देण्यात आली आहे. सदरची गुंतवणूक ही कर्ज रोख्याच्या माध्यमातून प्राप्त झाली असल्याचे सांगितले जात आहे. 31 ऑगस्टपर्यंत विदेशी पोर्टफोलीयो गुंतवणूकदारांनी 2 हजार 82.84 कोटी रुपये समभागांमध्ये गुंतवले होते. बाँड बाजारात एकंदर गुंतवणूक ही 14476 कोटी रुपयांची झाली आहे. या आधी जुलैमध्ये विदेशी गुंतवणूकदारांनी 7 हजार 768 कोटी रुपये बाजारात गुंतवले होते.









