मुंबई
एअर इंडियाचा कारभार सर्वात मोठे उद्योगपती रतन टाटा यांच्या कंपनीकडे सरकारने सुपूर्द केला आहे. या दरम्यान कंपनीच्यावतीने आगामी वर्षभर तरी कर्मचारी कपात करणार नसल्याचे आश्वासन रतन टाटा यांनी दिले आहे. 18 हजार कोटी रुपयांना टाटांनी हा व्यवहार पदरात पाडून घेतला आहे. एअर इंडियात सध्या 12 हजार 085 कर्मचारी काम करत असून यातील 4 हजार जण कंत्राट पद्धतीवर काम करत आहेत.









