प्रत्येकी 40 वे मुले जुळं, ही संख्या 50 वर्षांमध्ये सर्वाधिक
जगात दर 40 वे मुल जुळय़ाच्या स्वरुपात जन्माला येत आहे. वैज्ञानिकांनी आयव्हीएफ तंत्रज्ञानाने होत असलेल्या जन्माला याचे सर्वात मोठे कारण ठरविले आहे. सायन्स जर्नल ह्युमन रिप्रॉडक्शनमध्ये प्रकाशित संशोधनानुसार दरवर्षी सुमारे 16 लाख जुळी मुले जन्माला येत आहेत. ही संख्या मागील 50 वर्षांमध्ये सर्वाधिक आहे. संशोधकांनी यासाठी 135 देशांमधून 2010-2015 या कालावधीतील आकडेवारी जमविली आहे.
जुळी मुले जन्माला येण्याचे प्रमाण सर्वाधिक आफ्रिकेत आहेत. संशोधनात सामील ऑक्सफोर्ड विद्यापीठाचे प्राध्यापक क्रिश्टियान मॉन्डेन यांनी जुळय़ा मुलांची तुलनात्मक संख्या जगाच्या 20 व्या शतकाच्या मध्यानंतर आता सर्वाधिक असून हे प्रमाण आता दिवसेंदिवस वाढत जाणार असल्याचे म्हटले आहे. विकसित देशांमध्ये 1970 च्या दशकापासून प्रजननात मदत करणारे तंत्रज्ञान म्हणजेच एआरटीचा उदय झाला होता. ज्यानंतर जुळय़ा मुलांचा जन्म अधिक संख्येत झाल्याचे ते म्हणाले.
सद्यकाळात बहुतांश महिला अधिक वयात मातृत्व अनुभवत असल्याने त्यांना जुळी मुले होण्याची शक्यता वाढते. वैज्ञानिकांनी जन्मदरात झालेल्या घसरणीलाही याकरता जबाबदार मानले आहे.
काही देशांमध्ये लक्ष देण्याची गरज

कमी आणि मध्यम उत्पन्नगटातील देशांमध्ये जुळय़ा मुलांवर अधिक लक्ष देण्याची गरज आहे. सब सहारा आफ्रिकेत विशेषकरून अनेक मुले स्वतःच्या जुळय़ा सहकाऱयाला पहिल्या वर्षीच गमावतात. संशोधनानंतर ही संख्या दरवर्षी 2-3 लाखापर्यंत असल्याचे संशोधन अहवालाचे सहलेखक जरोएन स्मिथ यांनी म्हटले आहे.









