प्रतिनिधी /काणकोण
दावणगिरी, कर्नाटकातून केळी घेऊन मडगावला जाणारे वाहन लोलये येथे राष्ट्रीय हमरस्ता 66 वर कलंडले. सुदैवाने या अपघातात चालक आणि क्लीनर सुखरूप बचावले असून केळय़ांची मात्र नासाडी झाली आहे. सकाळपासून सतत पडत असलेल्या पावसात लोलये येथे रस्त्यावरील भटक्या गुरांना चुकवून येत असताना सदर वाहन रस्त्याच्या बाजूला गेले आणि हा अपघात घडला, अशी माहिती या वाहनाच्या चालकाने दिली. दरम्यान, या रस्त्यावर सध्या भटक्या गुरांचा सुळसुळाट माजलेला आहे. मागच्या एकाच आठवडय़ात अशा प्रकारे चार ते पाच वाहने या रस्त्यावर अपघातग्रस्त होण्याचे प्रकार घडले आहेत.









