वृत्तसंस्था/ कारगील
लडाखच्या अत्यंत दुर्गम मानल्या जाणाऱया सीलमू या प्रदेशात हेलिकॉप्टर उतरविण्याची चाचणी यशस्वीरित्या करण्यात आली आहे. पवनहंसकडून ही चाचणी करण्यात आली. कारगीलच्या दुर्गम भागात हेलिकॉप्टर सेवेद्वारे जीवनावश्यक वस्तू पोहचविण्याच्या योजनेचा एक भाग म्हणून ही चाचणी घेण्यात आली. चाचणीसाठी सिलमू येथे तात्पुरते हेलिपॅड निर्माण करण्यात आले होते. ही माहिती लडाखच्या ऑटोनामस हील डेव्हलपमेंट कौन्सिलने दिली.









