क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
श्रीलंकेतील कोलंबो येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय ऍथलेटिक्स स्पर्धेत कर्नाटकाच्या सुजान स्टेनिता जताना हिने थ्रोईंग क्रीडाप्रकारांत चार सुवर्णपदके पटकावित भारताला चार सुवर्णपदके मिळवून दिली.
कोलंबो येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय ऍथलेटीक्स स्पर्धेत सुजान स्टेनिता जताना हिने गोळाफेक, थाळीफेक, भालाफेक व हातोडाफेक या क्रीडाप्रकारांत सुवर्ण पदके पटकाविली. ती सध्या एल. ऍण्ड टी. कंपनीमध्ये सहायक इंजिनियरिंग मॅनेजर म्हणून सेवा बजावत असून ती हायस्पीड बुलेट टेन, स्पेशल ब्रिज, एअरपोर्ट या प्रोजेक्टवर काम करीत आहे. ती बेळगावच्या सेंट जोसेफ स्कूलमध्ये व आरएलएस पदवीपूर्व महाविद्यालयात व केएलई इंजिनियरिंग महाविद्यालयामध्ये आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर एल. ऍण्ड टी. कंपनीमध्ये कार्यरत आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.









