क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
आनंद कोचिंग क्रिकेट अकॅडमी आयोजित 19 वर्षाखालील आंतर अकादमी क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात एसकेई सोसायटी संघाने आनंद क्रिकेट अकादमी ब संघाचा 166 धावानी पराभव करून 2 गुण मिळविले. मनिष घाटगे व निलेश रनसुभे यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
एसकेई सोसायटी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 33 षटकात सर्व बाद 246 धावा केल्या. त्यात मनिष घाटगेने 3 षटकार, 14 चौकारासह 41 चेंडूत नाबाद 89, आदित्य वारंगने 1 षटकार, 4 चौकारासह 42, अजय बेनकेने 5 चौकारासह 23 धावा केल्या. आनंद अकादमी ब तर्फे वादिराज बेनगेरीने 47 धावात 5 तर निलेश रनसुभेने 50 धावात 4 गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना आनंद अकादमी ब संघाचा डाव 17.3 षटकात 80 धावात आटोपला. त्यात वादीराज बेनगेरीने 3 चौकारासह 17 तर निलेश रनसुभेने 3 चौकारासह 16 धावा केल्या. एसकेईतर्फे अजय बेनकेने 19 धावात 3, प्रज्वलने 14 धावात 2, तर आदित्य वारंग व मनिष घाटगे यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.









