प्रतिनिधी / वास्को
मुरगांव पोर्ट ट्रस्ट फैलवाले कामगार संघातर्फे रूमडावाडा मुरगांव येथील श्री रूमडेश्वर देवस्थानच्या मूर्ती प्रतिष्ठापनामिमित्त आज मंगळवार दि. 9 रोजी सायंकाळी 6.30 वा. मुंबई येथील गायीका मिताली चव्हाण यांचा गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
श्री रूमडेश्वर सभामंडपात आयोजित केलेल्या कार्यक्रमात गायीका मिताली चव्हाण यांना यावेळी संवादिनीवर गोपाळ प्रभू (पणजी), तबल्यावर अमेय पटवर्धन (वास्को) तर तबल्यावर विश्वास परूळेकर साथसंगत करतील. निवेदकाची जबाबदारी गिरीष कोळमकर सांभाळतील. गायनाच्या कार्यक्रमाला श्रोत्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन मुरगांव पोर्ट ट्रस्ट फैलवाले कामगार संघाचे नवनाथ पांडुरंग नाईक यांनी केले आहे.









