15 दिवस बॅटरी क्षमता ः हार्टरेट, ऑक्सिजन मॉनिटरसारखे फिचर्स
नवी दिल्ली
रीबॉकने भारतामध्ये आपले पहिले स्मार्टवॉच सादर केले असून याचे नाव रीबॉक ऍक्टिव्ह फिट 1.0 असे ठेवले आहे. कंपनीने सदरचे स्मार्टवॉच ऍमेझॉनवर लाँच केले आहे. सदर स्मार्टवॉच ब्लॅक, ब्लू, वेनी आणि रेड या चार रंगांमध्ये उपलब्ध होणार आहे. या वॉचची किमत हि 4,499 रुपये असून याची विक्री 28 जानेवारीपासून सुरु होणार असल्याची माहिती आहे.
फिचर्स…
सदरच्यावॉचला 15 दिवस चालेल इतकी बॅटरीची क्षमता
एसपीओ2 आणि हार्टरेट सेंसर सारखी अनेक फिचर्स
वॉच 1.3 इंचसोबत एचडी डिस्प्लेसह उपलब्ध
राउंड शेप डायल असणारे वॉच आयपी67 रेटिंगसह









