क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
बेंगळूर येथे एन. वाय. के. युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालयाच्या अमृत उत्सवानिमित्त आयोजित केलेल्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत बेळगावच्या राव स्क्वाड संघाने 14 सुवर्ण, 9 रौप्य पदके मिळवित घवघवीत यश संपादन केले.
या स्पर्धेत कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, आंध्रप्रदेश, तेलंगण, गोवा, महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, ओरिसा, प. बंगाल येथून जवळपास 1 हजारहून अधिक क्रीडापटू सहभागी झाले होते. त्यामध्ये बेळगावच्या राव स्क्वाड अकादमीच्या खेळाडू सुमय्या पाच्छापुरेने 35 किलो कॅडेट मुलींच्या गटात सुवर्ण, वैयक्तिक पुमसेमध्ये रौप्य पदक, सिद्धार्थ गौडा गौरीने 20 किलोखालील सब ज्युनियर गटात व केरूगी विभागात रौप्य पदक पटकाविले तर वैयक्तिक कुंगसे विभागात सुवर्ण पदक, पवनराज दड्डीकरने 20 किलोखालील मिनी सब ज्युनियर मुलांच्या गटात केरूगी विभागात रौप्य, वैयक्तिक कुंगसेमध्ये रौप्य पदक मिळविले. सानवी सागर पाटीलने 25 किलोखालील मिनी सब ज्युनियर मुलींच्या गटात केरूगी विभागात रौप्य तर वैयक्तिक कुंगसे विभागात सुवर्ण, श्रेया नागेश मेत्री हिने 35 किलोखालील ज्युनियर मुलींच्या गटात केरूगी विभागात व कुंगसे विभागात 2 सुवर्ण, जया पुजारीने 30 किलोखालील सब ज्युनियर मुलींच्या केरूगी विभागात सुवर्ण, वैयक्तिक कुंगसे गटात रौप्य, जितेश पुजारीने 75 किलोखालील ज्युनियर मुलांच्या गटात, केरूगी विभागात व वैयक्तिक कुंगसेमध्ये 2 सुवर्ण पदके पटकावली.
सुकन्या अशोक खोत हिने 40 किलोखालील मुलींच्या गटात केरूगीमध्ये रौप्य तर कुंगसेमध्ये सुवर्ण पदक पटकाविले.
श्रेयस नागेश मेत्रीने 35 किलोखालील मुलांच्या गटात केरूगी व कुंगसेमध्ये सुवर्ण, श्रेया मारूती अतिवाडकरने कुंगसेमध्ये कॅडेट गटात सुवर्ण पटकाविले. वैभव राजेश पाटीलने 55 किलो वरि÷ मुलांच्या गटात केरूगीमध्ये सुवर्ण तर कुंगसेमध्ये रौप्य पदक, स्वप्नील राजाराम पाटीलने 70 किलो वरि÷ मुलांच्या गटात केरूगीमध्ये सुवर्ण तर कुंगसेमध्ये रौप्य पदक
पटकाविले.
या सर्व क्रीडापटूंना भारतीय वायुसेनेचे आंतरराष्ट्रीय तायक्वांदो प्रशिक्षक श्रीपाद आर. राव यांचे मार्गदर्शन तर आंतरराष्ट्रीय पंच प्रभाकर शेटबाळे व महादेव मुटनले यांचे प्रोत्साहन लाभत आहे.









