क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
येथील आयुर जिमतर्फे राज्यस्तरीय स्केटिंग व कुस्ती स्पर्धेत यश संपादन केलेल्या खेळाडूंचा खास गौरव करण्यात आला.आयुर जिमच्या सभागृहात राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेत सुवर्ण विजेता मंजुनाथ मंडोळकर, यशपाल पुरोहित, यशवर्धन परदेशी, देवेन बामणे, भक्ती हिंडलगेकर, अक्षता सावंत, जिल्हास्तरीय स्पर्धेत आदर्श निकम, खुषी जरतवाडकर तर जिल्हा कुस्ती स्पर्धेत विजेत्या ईश्वर बिजगरकर आदी खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
त्याचप्रमाणे नितीन जाधव व राजू भातकांडे यांचा गौरव डॉ. मिलिंद हलगेकर, आयुर जिमचे संचालक एम. के. गुरव यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सुनिल राऊत, राजकुमार दोरगुडे, श्रेयस गुरव, जोतिबा राजाई आदी मान्यवर उपस्थित होते.









