मार्च महिन्यातील लौकिक मुहूर्त आणि इतर माहिती
क्र. विशेष तारीख
1 शुभ दिवस 1 स 9.30 प, 3 स 9.30 नं, 4,5,9,11, 13 स 8.30 नं, 16 स 10.30 नं, 17 दु 2.15 नं, 18, 22, 23, 27,
28 सायं 5 प, 29 श 8 नं, 30 , 31
2 अशुभ दिवस 2, 7, 8, 10, 15, 19, 20, 21, 24, 25
3 अनिष्ट दिवस 12, 14, 21
4 सण/ उत्सव/ विशेष तिथी 2- एकादशी, 3- आमलकी एकादशी, 6- हुताशनी पौर्णिमा (4.17 नं, होलिका प्रदीपन), 7- धुलिवंदन, 8- वसंतोत्सव प्रारंभ, 10 छ. शिवाजी महाराज जयंती, 11- संकष्टी, 12- रंगपंचमी, 18- पापमोचनी एकादशी, 19- रवी प्रदोष, 22- गुढी पाडवा चैत्र मासारंभ, 23- अक्कलकोट स्वामी समर्थांचा प्रकट दिन, 27- जोतिर्लिंग यात्रा, 29- शिर्डी साई बाबा उत्सवारंभ, 30- श्री राम नवमी, गजानन महाराज उत्सव शेगांव
5 अमावास्या 20 उत्तर रात्री 1.47 ते 21 उत्तर रात्री 10.53 पर्यंत
6 पौर्णिमा 6 दु 4. 17 ते 7 सायंकाळी 6.09 पर्यंत
7 साखरपुडय़ाचे मुहूर्त 8, 9, 13, 17 दु 2.30 नं, 18, 22, 23, 27
8 बारसे (नामकरण) मुहूर्त 3, 8, 9, 13 स 8.30 नं, 17 दु 2.30 नं
10 जावळाचे मुहूर्त 1, 3, 9, 10, 12, 22, 23, 30, 31
11 भूमिपूजन/पायाभरणीचे मुहूर्त 8, 9
12 पाया खणणे मुहूर्त 5, 12 स 8 नं,
13 गृहप्रवेशाचे मुहुर्त (व्यावहारिक मुहूर्त) 1, 3, 4, 8, 9, 12, 13, 22, 23, 29, 31
14 वास्तूशान्तीचे मुहूर्त 1, 3, 4, 6, 8, 9, 10, 13, 18
15 व्यापार सुरु करण्याचे मुहूर्त 3 दु 4 नं, 4 सायं 6.30 प, 8, 9, 13 स 8.30 नं, 17 दु 2.15 नं
16 वाहन खरेदीचे मुहूर्त 3 स 9 .30 नं, 8, 9, 13 स 8.30 नं, 17 दु 2.15 नं, 19,22,26, 27, 31
17 शेत जमीन/जागा/प्रॉपर्टी/ फ्लॅट खरेदीसाठीचे मुहूर्त 1 श 10 प, 2, 6, 7, 12, 13, 16, 21, 22, 31
18 शेतीकामांसाठी उपयुक्त दिवस 11, 12, 14
19 डोहाळे मुहूर्त 3, 9, 22, 27, 28, 30, 31
20 पंचक रविवार 19 मार्च 2023 सकाळी 11.17 पासून गुरुवार 23 मार्च 2023 दु 02.09 पर्यंत
विशेष सूचना- वरील मुहूर्त आणि इतर माहिती ही वेगवेगळय़ा पंचांगांच्या आधारे आणि स्वानुभवाने दिलेली आहे. लौकिक मुहूर्त म्हणून याकडे बघावे. विवाह आणि उपनयन याचे मुहूर्त दिलेले नाहीत कारण पत्रिकांचा सखोल अभ्यास करून हे मुहूर्त काढावेत असे माझे मत आहे.
मेष
चैनीच्या वस्तूंकरता खर्च जास्त होण्याची शक्मयता आहे. मनात निगेटिव्ह विचार आले तरी निराश होऊ नका. या काळात सगळय़ा प्रकारच्या सुविधांचा लाभ घ्याल. कुटुंबामध्ये लहान मोठय़ा कारणाने वादविवाद होऊ शकतो. कुटुंबातील एखादी व्यक्ती प्रवासानिमित्त परगावी जाऊ शकते. या काळात मन धार्मिक होईल. मनातील हेतू शक्मयतो इतरांशी शेअर करू नका. तब्येतीकडे विशेष ध्यान द्यावे लागेल. स्थावर मालमत्तेसंबंधी व्यवहार सध्या टाळा.
उपाय लाल गाईची सेवा करा
वृषभ
तब्येतीची विशेष काळजी करण्याचे कारण नाही. कुटुंबात एखादा समारंभ साजरा कराल. कौटुंबिक स्वप्न उत्तम मिळेल. प्रवासाची शक्मयता असल्यास सध्या टाळलेला बरा. स्थावर मालमत्तेसंबंधी असलेले प्रश्न दूर होतील. शेअर बाजारापासून दूर राहणे शहाणपणाचे ठरेल. नोकरीत मानसन्मान प्राप्त होईल. पैशाची आवक उत्तम असेल. वैवाहिक सुख उत्तम प्राप्त होईल. अपघातापासून सावध रहा.
उपाय गरजूला वस्त्रदान करावे
मिथुन
आरोग्याच्या दृष्टीने भाग्यवान असाल. कौटुंबिक कलहाला सामोरे जावे लागण्याची शक्मयता आहे. धनप्राप्तीकरता विशेष प्रयत्न करावे लागतील. लहान भावंडांची मदत मिळेल. कागदोपत्री व्यवहार यशस्वी ठरतील. मातृ चिंतेचा काळ आहे. प्रेम संबंधांमध्ये मधुरता येईल. छोटय़ा गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्मयता आहे. नोकरदार वर्गाला बढती किंवा पगारवाढ होईल. वैवाहिक जोडीदाराची योग्यवेळी साथ प्राप्त होईल.
उपाय पक्ष्यांना दाणे घालावे
कर्क
तब्येतीची अत्यंत काळजी घेणे गरजेचे आहे. वैद्यकीय सल्ल्याशिवाय कुठलाही उपाय करू नका. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य प्राप्त होईल. धनप्राप्ती समाधानकारक असेल. प्रवास कोणत्याही परिस्थितीत टाळावा. नुकसान होण्याची शक्मयता आहे. स्थावर मालमत्तेसंबंधी चांगले योग बनत आहेत. या संधीचा लाभ घ्यावा. गुंतवणुकीतून चांगला फायदा होऊ शकतो. या काळात मन करमणुकीकडे वळलेले असेल. गुप्त शत्रूंपासून सावध रहा.
उपाय चांदीच्या भांडय़ातून पाणी प्यावे
सिंह
कौटुंबिक वाद विवादामुळे मन खिन्न होऊ शकते. कुटुंबातील एखाद्या सदस्याचा व्यर्थ हट्ट वादाला कारणीभूत ठरेल. कामानिमित्त प्रवास करत असताना आपल्या सामानाला जपावे. ज्ये÷ व्यक्तीचा सल्ला कामी येईल. वाहन खरेदीचे योग होत आहेत. प्रॉपर्टीसंबंधी कामात यश मिळेल. प्रेमसंबंधांच्या दृष्टीने अनुकूल काळ आहे. नोकरीमध्ये कामाचे कौतुक होऊन बढती किंवा पगारवाढ होऊ शकते. वैवाहिक जोडीदाराशी वादविवाद होतील.
उपाय मजुरांना ताक दान द्यावे
कन्या
तुमच्या स्वतःच्या चुकीमुळे तब्येतीवर परिणाम होऊ शकतो आणि तब्येत बिघडू शकते. त्यामुळे कोणताही आजार अंगावर न काढता ताबडतोब वैद्यकीय सल्ला घ्यावा. कुटुंबातील व्यक्ती एकमेकांच्या कामांमध्ये मदत करतील. धनप्राप्ती उत्तम असेल. प्रवासाचे योग आहेत. जागेसंबंधी असलेले प्रश्न कमी होत जातील. जागा खरेदी करण्याचा विचारदेखील कराल. प्रेमसंबंधात वाढ होईल. नोकरदार वर्गाने सावध राहण्याची गरज आहे.
उपाय हिरवी काचेची गोटी जवळ ठेवावी
तूळ
गेले काही दिवस तब्येतीच्या तक्रारीमुळे त्रस्त असाल तर हळूहळू तब्येत सुधारत जाईल. चिंता करण्याची गरज नाही. या काळात जिभेवर संयम ठेवण्याची गरज आहे. खाण्यापिण्याच्याबाबतीत सावध रहा. बोलतानादेखील योग्य शब्दांचा वापर करा. कौटुंबिक समाधान प्राप्त होईल. धनप्राप्ती उत्तम असेल. करमणुकीकरता प्रवास करू शकता. सगळय़ा प्रकारचे सुख प्राप्त होईल. शेअर बाजारापासून दूर रहा. वैवाहिक जीवनात तणाव असेल.
उपाय रुद्राभिषेक करावा
वृश्चिक
कौटुंबिक समाधान, धनप्राप्ती, प्रवास आणि मुख्य म्हणजे तब्येत या दृष्टीने अनुकूल काळ सुरू होत आहे. कोणतेही कर्म करत असताना त्याचा सारासार विचार करणे गरजेचे असेल. लहान भावंडाच्या सहकार्याने एखादे काम पूर्ण करू शकाल. या काळात पैसे साठवण्याकडे कल असेल. तब्येत सुधारल्यामुळे आत्मविश्वासात वाढ होईल. जमिनीचे व्यवहार टाळावेत. नोकरदार वर्गाने सावध रहावे. वरिष्ठ त्रास देतील.
उपाय तुरीच्या डाळीचे दान द्यावे
धनु
आपलेच म्हणणे खरे किंवा मीपणा टाळण्याचा प्रयत्न करा. अति आत्मविश्वास घातक ठरू शकतो. तब्येतीची विशेष तक्रार असणार नाही. अपचन किंवा पोटाचे विकार थोडेफार त्रास देतील. धनप्राप्ती उत्तम असेल. कुटुंबातील वरि÷ सदस्यांचे सहकार्य प्राप्त होईल. सध्या प्रवास टाळलेला बरा. धोकादायक गुंतवणूक अजिबात करू नका. वैवाहिक जीवनामध्ये मधुर क्षण येतील. जुनी येणी वसूल होणे कठीण दिसते. मित्रांकडून लाभ होईल.
उपाय आंघोळीच्या पाण्यात एक चमचा दूध घालावे
मकर
आरोग्याच्या दृष्टीने अनुकूल काळ आहे. कौटुंबिक वातावरण मात्र काहीसे गढूळ दिसते. या काळात कुणालाही उधारी दिली तर ती परत मिळण्याची शक्मयता कमी आहे. आईच्या तब्येतीविषयी काळजी वाटू शकते. जमिनीचे व्यवहार करत असताना सावध राहण्याची गरज आहे. कागदपत्रे नीट तपासून मगच व्यवहार करावा. नोकरदार वर्गाला कष्टाचे चांगले फळ मिळेल. मात्र दुसऱयाची कामे स्वतः वर ओढवून घेऊ नका.
उपाय काळय़ा गाईला चारा घालावा
कुंभ
हवामान बदलाचा तब्येतीवर परिणाम होईल त्यासाठी शक्मयतो काळजी घ्यावी. या काळात प्रतिकारशक्ती कमी असल्याने विकार लवकर होण्याची शक्मयता असते. लहान भावंडांशी वादावादी होण्याची शक्मयता आहे. शेजाऱयामुळे त्रास होण्याचीही शक्मयता आहे. छोटय़ा गुंतवणुकीतून चांगला लाभ होऊन धनप्राप्ती होऊ शकते. प्रेम संबंध मजबूत होतील. नोकरी करणाऱयांनी आपल्या कामात जराही चूक होऊ देऊ नये.
उपाय मंगळवारी हनुमंताचे दर्शन घ्यावे
मीन
आपण बरे आणि आपले काम बरे असा दृष्टिकोण ठेवा, फायदा होईल. दुसऱयाने सांगितलेल्या बातमीवर विश्वास ठेवून काम करणे नुकसानदायक ठरू शकते. एखाद्या चुकीच्या निर्णयामुळे कुटुंबात वादविवाद होतील. जमिनीच्या कामांकरता उत्तम काळ आहे. शेअर बाजारापासून कटाक्षाने दूर राहा. प्रेमसंबंधात ताण-तणाव येऊन ब्रेकअपची शक्मयता आहे. वैवाहिक जोडीदाराकडून जास्त अपेक्षा करणे निराशाजनक ठरू शकते.
उपाय पिवळी फुले पाण्यात सोडावीत





