मेष
इच्छित वस्तू ची प्राप्ती होईल. कुटुंबाचे सहकार्य मिळेल. धनप्राप्ती उत्तम असेल. प्रवासाचे चांगले योग बनताहेत. भावंडांचे सहकार्य मिळेल. जमीन आणि वाहन प्राप्तीचे योग आहेत. गुंतवणुकीतून फायदा होईल. गुप्त शत्रूंचा त्रास कमी होईल. चहाडी करणार्यांची तोंडे बंद होतील. व्यवसायामध्ये नाव कामवाल. लाभाची शक्मयता जास्त आहे.
मुक्या जनावरांची सेवा करावी
वृषभ
नवीन उत्साह जाणवेल. शारीरिक क्षमतेमध्ये वाढ होईल. धनप्राप्ती सहजतेने होईल. जुनी येणी वसूल करण्याकरता विशेष प्रयत्न करावे लागतील. प्रवास शक्मयतो टाळावा. ज्ये÷ व्यक्तींशी मतभेद होऊ शकतात. प्रेम प्रसंगात ताणतणाव येईल. धोकादायक गुंतवणूक करू नका. नोकर वर्गाला उत्तम काळ आहे. वैवाहिक जोडीदाराशी भांडण संभवते. देव दर्शनाकरता प्रवास कराल.
दिव्यांगाना आर्थिक मदत करावी
मिथुन
पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून आर्थिक फायदा होईल. आरोग्याची साथ मिळेल. कुटुंबात वाद विवाद संभवतात. प्रवास त्रासदायक ठरू शकतो. जमिनीचे व्यवहार टाळावेत. प्रेमीजनांना उत्तम काळ आहे. नोकर वर्गाला कष्टाचे प्रमाण वाढवावे लागेल. वैवाहिक जीवन मधुर असेल. वाहन जपून चालवा दुखापतीची शक्मयता आहे. सगळय़ा प्रकारचे लाभ संभवतात.
पिवळा हात रुमाल जवळ ठेवावा
कर्क
बिघडलेली तब्येत सुधारेल. पैशांची आवक उत्तम असेल. घरात छोटेखानी समारंभ होऊ शकतो. प्रवास टाळावा .वाहन सूख उत्तम आहे. छोटय़ा गुंतवणूकीतून फ़ायदा होईल. नोकरदार वर्गाला उत्तम दिवस आहेत. वैवाहिक जीवन सुखमय असेल. कष्टाची तयारी ठेवावी. गुप्त शत्रू नाव बदनाम करण्याची शक्मयता आहे. सावध असावे. लाभाचे योग बनत आहेत.
गरजू व्यक्तीला छत्री दान द्या
सिंह
जवळच्या व्यक्तीला भेटण्या करता गावाला जावे लागू शकते. काही ठिकाणी पैसे अडकण्याची शक्मयता आहे. वसुली करता विशेष प्रयत्न करावे लागतील. कुटुंबामध्ये थोडाबहुत कलह संभवतो. स्थावर संपत्तीच्या बाबतीत जर वाद असतील तर तेच उघडण्याची शक्मयता आहे. गुंतवणुकीतून फायदा होईल. प्रेमप्रकरणात यश मिळेल. नोकरदार वर्गाला वरि÷ांचे टोमणे खावे लागतील. वैवाहिक जीवनात ताणतणाव असेल.
घरात उत्तरेला हळकुंड ठेवा
कन्या
नोकरदार वर्गाने या काळामध्ये विशेष काळजी घेतलेली बरी. तुमच्या कष्टांना किंवा तुमच्या कामे पूर्ण करण्याच्या पद्धतीला वदाद मिळेलच असे सांगता येत नाही. तब्येतीला जपावे लागेल. कुटुंबातील एखादी व्यक्ती बाहेरगावी जाऊ शकते. शेजाऱयांकडून किंवा लहान भावंडांकडे अपेक्षित मदत मिळेल. जमिनीचे व्यवहार पूर्ण होण्याच्या मार्गावर असतील.
पोवळे जवळ ठेवावे
तूळ
आर्थिक बाबतीमध्ये अत्यंत सावध राहण्याची गरज आहे. एखादी व्यक्ती जी तुमची पैसे लुबाडण्याच्या मार्गावर आहे तिच्यापासून दूर राहावे. प्रवास टाळावा कारण धन हानी होऊ शकते. वाहन संबंधी तक्रार येईल. गुंतवणुकीतून फायदा होईल. नोकरीत चूक घडण्याची शक्मयता आहे. वैवाहिक जीवनात आनंद मिळेल. अचानक धनप्राप्तीचे योग होत आहेत. मित्रांपासून लाभ होईल.
लहान मुलीला फळ भेट द्या
वृश्चिक
कुटुंबात नवचैतन्य येईल. प्रभास सांभाळून करावा. मात्र चिंता वाटेल. धोकादायक गुंतवणुकीपासून दूर राहण्यात शहाणपणा आहे. नोकरदार वर्गाने वरि÷ांची मर्जी राखलेली बरी. वैवाहिक जीवनात ताण तणावाचे प्रसंग येऊ शकतात. वाहन चालवताना अत्यंत सावध राहणे गरजेचे आहे. धार्मिक यात्रेबद्दल चर्चा कराल. कोर्ट मॅटर स मध्ये सफलता मिळेल.
गुरुवारी चणे दान द्या
धनु
घरातील एखाद्या व्यक्तीच्या वागण्याचा त्रास होऊ शकतो. आपल्या मनातील गोष्ट दुसऱयांना सांगण्याच्या भानगडीत पडू नका. तब्येत ठीकठाक राहील. पैसे मिळवण्याकरता जास्त कष्ट करण्याची गरज आहे. जमिनीच्या व्यवहारांमध्ये यश मिळण्याची शक्मयता आहे. नोकरीमध्ये दुसऱयाच्या चुकी मुळे बोलणी खावी लागू शकतात. वैवाहिक जोडीदाराशी भांडण होण्याची शक्यता आहे.
गाईला चारा घाला
मकर
तब्येतीची हेळसांड करू नका. दुखणे विकोपाला जाण्याची शक्मयता आहे. आर्थिक आवक ठीकठाक राहील. कामाकरता प्रवास करावा लागू शकतो. स्थावर मालमत्ता आणि वाहन याबाबतीत असलेली चिंता मिटेल. प्रेमसंबंधात दुरावा येण्याची शक्मयता आहे. धोकादायक गुंतवणुकी पासून चार हात लांब राहा. नोकरीत राजकारणाचा वीट येईल. वैवाहिक जीवनात ताणतणाव असेल.
केळीच्या झाडा खलील माती जवळ ठेवा
कुंभ
जान है तो जहान है हे लक्षात ठेवून तब्येतीची योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. काही बाबतीमध्ये आत्मविश्वास कमी पडेल त्याचबरोबर कुटुंबाची साथही तितकीशी मिळणार नाही. पैशांची आवक चांगली असेल. नोकरदार वर्गाला अनुकूल काळ आहे. कामाच्या कौतुका बरोबर इन्क्रिमेंट सुद्धा मिळू शकते. जमिनीच्या व्यवहारात यश मिळेल.
वैवाहिक आयुष्य उत्तम असेल. अन्न दान करा
मीन
आरोग्य चांगले असेल. मित्रमैत्रिणींशी असलेले संबंध दृढ होतील. धनप्राप्ती उत्तम असेल. कुटुंबात सुसंवाद घडेल. प्रवासाचे योग आहेत. मातृ सुख चांगले मिळेल. प्रेम संबंधात दुरावा येईल. पैसे उधारी दिल्यास परत मिळणार नाहीत. नोकरदार वर्गाला प्रशंसा प्राप्तीचे योग आहेत. वैवाहिक जीवनात सुवर्ण काळ असेल. सगळय़ा प्रकारचे लाभ होतील. वडिलांविषयी काळजी वाटू शकते.
पिंपळाचे पान जवळ ठेवा
भग्यांक म्हणजे तुमच्या जन्म तारखेच्या सगळय़ा अंकांची एक आकडी बेरीज. उदा.समजा जन्म तारीख आहे 28-03-1978 तर 2+8+0+3+1+9+7+8 = 38 आता परत 3+8=11 आणि 1+1 = 2 हा तुमचा भाग्यांक. हा भाग्यांक डाव्या हाताच्या अंगठय़ा खालील फ़ुगीर भागावर हिरव्या पेन ने रोज सकाळी लिहिवा. भाग्य साथ देते





