रवि. 22 ते 28 नोव्हेंबर 2020
मेष
या सप्ताहात वृश्चिकेत बुध प्रवेश, चंद्र, शुक्र त्रिकोण योग होत आहे. धंद्यात व्यवहाराची बोलणी करताना भावना व व्यवहार यांचे योग्य भान ठेवा. अहंकाराने बोलू नका. धंदा मिळवा. नोकरीत कामाचा ताण वाढेल. संसारात वृद्ध व्यक्तीची काळजी घ्या. प्रेमाची माणसे मदत करतील. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचा वाढता प्रभाव पाहून विरोधकांचा जळफळाट होईल. गोड बोलून कार्यभाग साधा. दौऱयात, प्रवासात सावध रहा. जिद्द ठेवा, परीक्षा द्या.
वृषभ
या सप्ताहात वृश्चिकेत बुध प्रवेश, चंद्र, गुरु लाभयोग होत आहे. धंद्यात सुधारणा करता येईल. भागिदार, गिऱहाईक यांच्याशी वाद वाढवू नका. हिशोब नीट करा. राजकीय, सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढेल. तुम्हाला मोठय़ा अनुभवी व्यक्तीचे सहकार्य मिळेल. चर्चा यशस्वी होईल. अधिकार मिळण्याची शक्मयता वाढेल. नोकरीत वरि÷ांना खूष कराल. मैत्रीत मतभेद होईल. संसारात जवळच्या माणसांची काळजी घ्या. परीक्षेत यश मिळेल.
मिथुन
या सप्ताहात वृश्चिकेत बुध प्रवेश, चंद्र, शुक्र त्रिकोण योग होत आहे. धंद्यात तडजोड करावी लागेल. आळस करू नका. मेहनत घ्या. राजकीय-सामाजिक कार्यात अडचणी येतील. मनोबल टिकवून ठेवता येईल. अरेरावीचे वक्तव्य महागात पडेल. नोकरीत काम वाढेल. उद्धट बोलणे टाळा. नोकरी टिकवा. कायद्याचा भंग होईल, असे कोणतेही कृत्य टाळा. परीक्षेसाठी मेहनत घ्या. संसारात आनंदी रहाल. मुले आनंद देतील. वृद्धांची चिंता राहील.
कर्क
या सप्ताहात वृश्चिकेत बुध प्रवेश, सूर्य, चंद्र त्रिकोण योग होत आहे. धंद्यात मोठा फायदा करण्याचा प्रयत्न करता येईल. मेहनत घ्या. नवे काम मिळवा. सप्ताहाच्या सुरुवातीला क्षुल्लक अडचण येईल. तणाव होईल. नोकरीत वरि÷ांचा विश्वास संपादन कराल. चांगला बदल करण्याचा विचार करता येईल. राजकीय, सामाजिक कार्याला नवे स्वरुप देता येईल. लोकांच्या हिताची योजना राबवता येईल. तुमच्या क्षेत्रात, शिक्षणात मागे राहू नका.
सिंह
या सप्ताहात वृश्चिकेत बुध प्रवेश, चंद्र, शुक्र त्रिकोण योग होत आहे. धंद्यात टिकून राहण्यासाठी मेहनत घ्या. मागील येणे वसूल करा. नवीन परिचयातून काम मिळेल. राजकीय, सामाजिक कार्यात चौफेर सावध रहा. तुमच्या कामातील चुका काढल्या जातील. कायद्याचा नीट अभ्यास करा. योग्य व्यक्तीचा सल्ला घ्या. नोकरीत धावपळ वाढेल. प्रवासात काळजी घ्या. घरातील वडील माणसांची काळजी वाटेल. वाद वाढवू नका.
कन्या
या सप्ताहात वृश्चिकेत बुध प्रवेश, सूर्य, चंद्र त्रिकोण योग होत आहे. धंद्यात जम बसवण्याचा प्रयत्न करा. तुमचा राग वाढेल. अशा घटना आजूबाजूला घडतील. नोकरीत कामाचा व्याप वाढेल. खर्च वाढेल. राजकीय, सामाजिक कार्याला पुढे नेता येईल. लोकसंग्रह, लोकप्रियता वाढवण्याचा प्रयत्न करा. कला, साहित्य, शिक्षणात प्रगती होईल. मुलांच्या प्रगतीने मन आनंदी होईल. अनेक समस्या कमी करता येतील.
तुळ
या सप्ताहात वृश्चिकेत बुध प्रवेश, चंद्र, शुक्र प्रतियुती होत आहे. धंद्यात प्रसंगानुरुप निर्णय घ्या. वाद वाढवू नका. कायद्याच्या पालनाकडे लक्ष द्या. थकबाकी वसूल करा. नोकरीत प्रभाव टिकवता येईल. राजकीय, सामाजिक कार्यात महत्त्वाच्या मुद्यावर चर्चा करता येईल. योजनांना पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. संसारात सुखद समाचार मिळेल. कला, साहित्य, शिक्षणात प्रगती कराल. ओळखी होतील.
वृश्चिक
या सप्ताहात वृश्चिकेत बुध प्रवेश, चंद्र, गुरु लाभयोग होत आहे. धंद्यात गोड बोला. सप्ताहाच्या शेवटी तणाव, गैरसमज होईल. नोकरीत तुमच्या कामाचे कौतुक होईल. राजकीय, सामाजिक कार्यात प्रति÷ा वाढेल. जवळचे लोक, विरोधक तुमच्या कामात अडचणी निर्माण करतील. खाण्याची काळजी घ्या. क्षुल्लक क्यक्तीला कमी लेखू नका. शिक्षणात पुढे जाल.
धनु
या सप्ताहात वृश्चिकेत बुध, चंद्र, शुक्र त्रिकोण योग होत आहे. धंद्यात चर्चा करताना संयम ठेवा. काम फिसकटण्याची शक्मयता आहे. नम्रता ठेवा. गोड बोला. नोकरीत मतभेद होतील. राजकीय, सामाजिक कार्यात कोणतेही विधान करताना उतावळेपणा करू नका. कायद्याच्या बंधनाला कमी समजू नका. राग आवरा. कुटुंबात वृद्ध व्यक्तीची चिंता वाटेल. धावपळ करू नका.
मकर
या सप्ताहात वृश्चिकेत बुध प्रवेश, सूर्य, चंद्र त्रिकोण योग होत आहे. धंद्यातील समस्या सोडवता येईल. नवे काम मिळवा. थकबाकी वसूल करा. नोकरीत वरि÷ांना खूष कराल. नवा बदल करण्याचा विचार करता येईल. राजकीय, सामाजिक कार्याला वेगाने पुढे नेता येईल. कामाचे, मेहनतीचे सातत्य ठेवा. पाठपुरावा करा. कला, साहित्य शिक्षणात पुढे जाता येईल.
कुंभ
या सप्ताहात वृश्चिकेत बुध प्रवेश, सूर्य, चंद्र त्रिकोण योग होत आहे. महत्त्वाची कामे करण्याचा प्रयत्न करा. धंद्यात मोठे काम मिळवा. जुने येणे वसुल करा. नोकरीत तुमचे काम वेळेत पूर्ण करता येईल. राजकीय, सामाजिक कार्यात प्रभाव वाढेल. कायद्याच्या पालनाकडे लक्ष द्या. नवीन परिचय होतील. कला, साहित्य, शिक्षणात प्रगती कराल. घरातील कामे करून घ्या.
मीन
या सप्ताहात वृश्चिकेत बुध प्रवेश, सूर्य, चंद्र त्रिकोणयोग होत आहे. सप्ताहाच्या सुरुवातीला वादविवाद होईल, संयम ठेवा. प्रवासात घाई करू नका. धंद्यात गोड बोला. मौल्यवान वस्तू सांभाळा. नोकरीत कामात प्रगती कराल. मैत्रीत क्षुल्लक तणाव होईल. राजकीय, सामाजिक कार्यात लक्ष द्या. पदाधिकार मिळण्याची शक्मयता आहे. नवीन ओळखीवर विश्वास ठेवू नका. साहित्य, शिक्षणात प्रगती कराल.





