तस्लीमा नसरीन यांचे आवाहन
कोलकाता –
बांगलादेशी वंशाच्या आंतरराष्ट्रीय लेखिका तस्लीमा नसरीन आता अयोध्येतील भगवान श्रीराम यांच्या मंदिर उभारणीसंबंधी केलेल्या विधानावरून चर्चेत आल्या आहेत. अयोध्येत राम मंदिरासाठी अनेक मुस्लीम विहिंपच्या मोहिमेत दान करत आहेत. मुस्लिमांनी मंदिरासाठी निधीसंकलनाकरता पुढाकार घ्यावा. मुस्लिमांनी देगणी दिल्यास हिंदू-मुस्लीम सौहार्द दृढ होणार असल्याचे नसरीन यांनी ट्विट करत म्हटले आहे.
तस्लीमा यांच्या टिप्पणीचे अनेक जणांनी उघडपणे कौतुक केले आहे. भारतातील बहुतांश हिंदू राम मंदिराची उभारणी व्हावी या मताचे आहेत, मुस्लिमांप्रमाणे त्यांनाही पूर्णपणे धार्मिक कट्टरवादी होण्याचा अधिकार आहे. हिंदू आहे, म्हणून एखाद्याने धर्मनिरपेक्ष असावे हे आवश्यक नसल्याचे तस्लीमा यांनी यापूर्वी म्हटले होते.









