चाहत्यांना केले सतर्क
बॉलिवूड अभिनेत्री तब्बूचे इन्स्टाग्राम अकौंट हॅक झाले आहे. माझ्या अकौंटवरून माझ्या नकळत प्रमोशनल पोस्ट प्रसारित करण्यात आल्याचे सांगत तब्बूने चाहत्यांना कुठल्याही लिंकवर क्लिक न करण्याची सूचना केली आहे. तब्बूने बनावट पोस्टही हटविली आहे. या बनावट पोस्टमध्ये एका तासात 2 ते 5 हजार रुपये कमाविण्याची कथित पद्धत नमूद होती.
तब्बूपूर्वी बॉलिवूडमधील अनेक कलाकार हॅकिंगचे शिकार झाले आहेत. अलिकडेच शरद केळकर, अमिषा पटेल, ईशा देओल, फराह खान, विक्रांत मैसी, सुष्मिता सेन यांचा मुलगा रेने, उर्मिला मातोंडकर आणि सुझैन खान सायबर हल्ल्याला सामोरे गेले आहेत.
‘भूल भुलैया 2’मध्ये दिसणार
तब्बू लवकरच हॉरर-कॉमेडी चित्रपट ‘भूल भुलैया 2’ मध्ये दिसून येईल. चित्रपटात तब्बूसह कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणीही मुख्य भूमिके आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनीज बज्मी यांनी केले आहे.









