प्रतिनिधी / राधानगरी
जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून पावसाने पुन्हा हजेरी लावली आहे. धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने धरण पाणीपातळीत वाढ होत आहे. यामुळे राधानगरी धरणाचे यंदाच्या वर्षी चौथ्यादा स्वयंचलित दरवाजे खुले झाले आहेत.
आज पहाटे 3.00 वाजता गेट क्रं 6 ओपन झाला. यामुळे धरण पाणी पातळी – 347.41 फूटावर गेली आहे. गेट क्रं 6 मधून 1428 व गेट क्रं 3 मधून 1428 + बि.ओ.टी.पॉवर हाऊस मधून 1400 असा एकूण 4256 क्सूसेकने विसर्ग सुरू आहे. यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास पुन्हा पूर परिस्थिती निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.
Trending
- Testing1
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









