ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रातील मोठे नेते आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेत राज्य सरकारने कपात केल्यानंतर मनसे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. सोशल मीडियावर याबाबत अनेकांनी तीव्र प्रतिक्रिया दिली होती. दरम्यान, आता मनसेने राज ठाकरे यांना सुरक्षा देण्यासाठी महाराष्ट्र रक्षक पथक तयार केले आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितले की, आम्ही मनसे कार्यकर्ते राज ठाकरेंना सुरक्षा देण्यास समर्थ आहोत. मात्र, 2008-09 साली राज ठाकरेंना मारण्यासाठी युपी बिहार मधून एक तरुण बंदूक घेऊन आला होता हे ही सरकारने लक्षात ठेवावे.
पुढे ते म्हणाले, ज्या वरुण देसाई यांना धमकी काय तर कोणी गुदगुल्या ही करणार नाही. त्यांना मात्र, सुरक्षा देण्यात आली आहे. अशी टीकाही त्यांनी यावेळी शिवसेनेवर केली आहे.
महाराष्ट्र रक्षक नावाने टी शर्ट छापून मनसेचे कार्यकर्ते राज ठाकरे यांना संवरक्षण देणार आहेत.









